वाॅश - आढावा

करोनावर मात करण्यासाठी आवश्यक अशी तपासणीप्रक्रिया वॉश (WASH) आहे. करोनावर मात करण्यासाठी तयारी कशी काय करतात. याची माहिती सहाजिकच सर्वांना विशेषतः कंपनीच्या मालकांना आणि कंपन्यांनासुद्धा आवश्यक आहे. वॉश (WASH - वर्कप्लेस असेसमेंट फॉर सेफ्टी आणि हायजिन - Workplace Assessment for Safety and Hygiene) या स्टॅंडर्डच्या 15 घटकांच्या मदतीने कार्यस्थळातील सुरक्षितता आणि शुचिता यांच्यासाठी सर्टिफिकेट काही संस्थांनी मिळवले आहे. मराठा चेंबरने वॉश संदर्भात आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला सात संस्था आल्या होत्या. आणि तीन महिन्यात म्हणजे जुलैपासून ऑक्‍टोबर अखेरपर्यंत जवळ-जवळ सगळ्यांनीच सर्टिफिकेट मिळवले वा त्या दिशेने वाटचाल सुरू केली.

सगळ्यात प्रथम बाजी मारली कात्रज दूध डेअरी यांनी! सहकार क्षेत्रातील भारतातली पहिली डेअरी, महाराष्ट्रातली पहिली डेअरी, खाजगी क्षेत्राबरोबर स्पर्धा करत भारतातील सर्टिफाइड तिसरी डेअरी होण्याचा मान कात्रज दूध डेअरी यांनी मिळवला. सहाजिकच या यशाचे सर्वत्र कौतुक करायला राष्ट्रीय चॅनेलवर त्यांच्या संचालकांची आणि मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्हची मुलाखतही झाली. वॉश संदर्भात माहिती तुम्हाला कुठून मिळाली? - या प्रश्नाचे उत्तर आणि सर्व श्रेय त्यांनी अगदी स्पष्टपणे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी आयोजित केलेल्या या ज्ञानसत्रराला दिले. अथक केलेल्या ज्ञानदानाचा तसेच यशाचा हा सर्वात मोठा पुरावा होता.

कात्रजच्या पाठोपाठ रामेलेक्स या संस्थेनेही सर्टिफिकेट मिळवलं. त्यांच्या पाठोपाठ हेनकेल हिंजवडी आणि हेनकेल जेजुरी.... यशाची ही मालिका चालूच आहे. सहभागी झालेल्या सात पैकी चार संस्थांचे हे यश निश्चितच लक्षणीय आहे. आणि या मागे असणाऱ्या चेंबरच्या सर्वांचे श्रेय निश्चितच अभिनंदनीय आहे.

कात्रज दूध डेअरी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अनेक वर्तमानपत्रातूनही त्यांचं कौतुक झाल पण तरीही त्याहीपेक्षा पुढे कर्मचारी सहभागने त्यांनी वाढणारी करोना साखळी तोडल्यामुळे, गुणवत्ता विकास मंडळाचा म्हणजेच क्वॉलिटी सर्कल फॉरम ऑफ इंडियाच्या पुणे येथे त्यांनी केलेल्या सुधारणांची केसस्टडीतून गोल्ड अर्थात सुवर्णपदक मिळवत त्याची नॅशनलाही निवड झाली.

मला खात्री आहे नॅशनल व इंटरनॅशनलमध्ये असेच यश मिळवत कात्रजची घोडदौड चालू राहील. आणि त्यांच्याच दिशेने किंवा त्यांच्यासह इतरही प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या संस्था आणि सहभागी न होऊ शकलेल्या संस्था सामील होतील. आणि सर्वांच्या एकत्रित सहभागातून मराठा चेंबरच्या या प्रशिक्षणाचं फक्त यश अधोरेखित होणार नाही, तर आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारा मानपत्र मिळता मिळता, सर्वांच्या सहभागातून कोविड विरोधी लढणारे पथक प्रत्येक संस्थेतून उभे राहिल. आणि हे वीर ज्यांना प्रशिक्षण मिळालं नाही त्यांच्या आरोग्याची काळजी घेत कोविडला कट्टर विरोध करत राहतील. कोविडची साखळी तोडण्यात त्यांनी केलेल्या कामगिरीबद्ददल या सर्वांचे अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे. यांना तुमच्या मदती गरज आहे. यांच्या बरोबरीने प्रत्येक संस्थेने मग ती शिक्षण संस्था असो, वा फक्त दोन लोकांचे ऑफिस असो, एखादी टेस्ट लॅब असो, वा दुकान असो, किंवा दुधाचं डिस्ट्रीब्यूशन सेंटर असो, जिथे जिथे माणसे येण्याची शक्यता आहे, जिथे जिथे संपर्काचे शक्यता आहे, तिथे ही काळजी घेतली जावी, म्हणून आपल्या सर्टिफिकेशन च्या माध्यमातून सगळ्यांना प्रेरित करणे आजची गरज आहे, नव्हे प्रत्येक संस्थाचालकाचं ते प्रथम कर्तव्य आहे. आणि याची माहिती असणाऱ्या तुम्ही आम्ही सगळ्यांची ती एक सामाजिक बांधिलकी आहे. इतरही प्रशिक्षणामध्ये सहभागी न होऊ शकलेल्या संस्थातून यूरोनेट ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटर आणि जिंदाल पॉली फिल्मस, ग्लोबल नॉन वोव्हन डिव्हिजन यांच्या सर्टिफिकेट मिळवले यांच्या सहभागाने आमच्या कामगिरीला दाद मिळाली आहे.


काम फार मोठे आहे, पण शक्य आहे. सप्लायर्स चेन - पुरवठादारांची साखळी या मार्गाने किंवा स्वयंसेवकांची मदत, या मार्गाने सुद्धा आपण हा लढा लढू शकतो. सर्टिफिकेशनमध्ये आपल्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक संस्थांचे जसे हाउसकीपिंग करणाऱ्या संस्था किंवा कुरियर देणाऱ्या संस्था किंवा ट्रान्सपोर्टस् यांच्याही सुरक्षिततेचा विचार केला असता हे शक्य होईल. थोडक्यात सर्वांच्या सहभागातून एक सकारात्मकता तयार होते आणि आजच्या वातावरणात सर्वांनाच सकारात्मकतेची अत्यंत आवश्यकता आहे प्रत्येकानी आपल्या संस्थेत हे वातावरण सर्टिफिकेट किंवा मानांकन मिळवलं पाहिजे. करोनावर मात करण्यासाठी तयारी कशी काय करतात , कशी तयारी करावी त्याची ओळख सगळ्यांना व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच!

संपर्कामुळे होणारा करोनाचा प्रसार मर्यादित राहण्यासाठी करायच्या प्रतिबंधात्मक योजनांची माहिती या स्टॅंडर्डमध्ये दिली आहे . तपासणीसाठी आवश्यक अशी तपासणी सूची आणि वापरल्या जाणाऱ्या ऑडिट रिपोर्टची सर्व माहिती, वापरल्या जाणाऱ्या व्यक्तिगत सुरक्षा साधने म्हणजे पर्सनल प्रोटेकक्टीव ईकविपमेंट - पी. पी. ई. (PPE) - यांच्या वापराची, तसेच विल्हेवाटीची म्हणजेच डिस्पोजलची माहिती या स्टँडर्ड मध्ये दिली आहे. आपल्या कामामुळे किंवा कामाच्या संदर्भात येणारे व्यक्तीमुळे किंवा त्यांच्या गैरवर्तनामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून करायच्या प्रतिबंधक योजनांची यादी या स्टँडर्डमध्ये दिली आहे.

सगळी माहिती अगदी चेकलीस्ट (Checklist) सुध्दा नि:शुल्क किंवा फ्री या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ती समजून घेऊन, त्याप्रमाणे आपण काम करतो आहे, याची स्वतः पडताळणी करून झाल्यावर, आवश्यकता वाटल्यास इतरांना कळावं म्हणून सर्टिफिकेशन एजन्सीकडून किंवा थर्ड पार्टी कडून तपासणी करून घेणे, आवश्यक वाटल्यास करता येते. पण तुमच्या किंवा तुमच्या व्यवसायासंबंधी जे लोक आहेत, त्यांनी तुमच्या अत्यावश्यक सूचनांचे पालन करावे यासाठी आग्रह मात्र नक्की करा. सेल्फ सर्टिफिकेशन तरी करावे हा आग्रह धरा. कारण तुम्ही त्यांच्यावर अवलंबून असता. आणि हे परावलंबित्व तुम्हाला संसर्ग किंवा रोग देऊ शकते. तुम्हाला पण स्वतःची तसेच स्वतःच्या व्यवसायाशी काळजी - तो बंद तर होत नाही ना, ही काळजी घेतली पाहिजे.

वाॅश फक्त दहा हजार पाचशे मध्ये तपासून मिळणार आहे. आणि त्या रिपोर्टमध्ये सर्टिफिकेट असणार आहे.

यासाठी आहेत ते सुरक्षिततेचे प्रतिबंधक उपाय तसेच पर्याय समजून घेण्यासाठी मदत झाली. त्यामुळे झेड करायचं नसेल तरीही तुमच्या व्यवसायाचं सातत्य किंवा सुरक्षिततेच्या कडे कानाडोळा न करता किंवा संसर्गामुळे दुबळी न राहता या करोना संकटाला तोंड देण्याची तुमची व्यावसायिक कुवत किती आहे, हे तपासण्यासाठी तुम्हाला वॉश या मानकाची

तसेच वॉश म्हणजे कार्य स्थळाची सुरक्षितता आणि शुचीता याचीही आपण ओळख करून घेणाली. थोडक्यात आजच्या काळाला, आजच्या संकटाला अनुसरून, आपल्याकडे किती डाटा (Data) असावा ? तो डाटा कश्यासाठी वापरावा? आपण कोणाकोणावर अवलंबून आहोत? आणि सातत्यासाठी कुठली प्रक्रिया, व्यक्ती, उपकरणं, ग्राहक, पुरवठादार, माहिती यासारख्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, याचा विचार प्रत्येकाने केला असेल. पण तो एका सुसूत्रतेने करून आपल्या व्यवसायात प्रत्येक गोष्टींचा स्थान काय आहे हे तथा ही संकल्पना समजून घेणे आपल्याला खूप मदतीचे ठरणार आहे. या परिणामांची जाणीव यामुळे झाली. आपल्या व्यवसायात सातत्याने सुधारणा, आणि त्वरेने किंवा अत्यंत गतीने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी करायची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन या व्याख्यानमालेत मिळाली.

सध्या सगळी झेडची टीम वाॅश (WASH) वर काम करते आहे. आणि करोनासारख्या कुटिराघात - बिझनेसवर झालेल्या आघातामुळे व्यवसाय सातत्य मार्गदर्शन सगळ्यांना समयोचित ठरेल असं वाटलं होतं.

खरं तर सगळेच अभ्यास करत असतात आणि तरीही परीक्षा दिली जाते. काहीजण पहिले येतात, पैकीच्यापैकी मार्क मिळतात. तर काही जणांना परत परीक्षेला बसावे लागते. ‘कॉमन सेन्स् इज् नॉट सो कॉमन’’ असं म्हणतात ते उगीच नाही. सगळ्यांनी काळजी सगळ्यांना घेऊन, सुद्धा पाच वेळा लॉकडाऊनची (Lockdown) नामुष्की आपल्यावर आली. याचा अर्थ उघड आहे. प्रत्येक जण प्रतिबंधात्मक काळजी घेतच असतो. पण तरीही काहीजण कमी प्रमाणात घेतात. कदाचित ..

ठीक आहे न घेण्याचे कारण त्यांचं अज्ञान किंवा चालतं ही वृत्ती असावी. पण यातून काही त्रुटी राहून जातात. आणि त्यांच्या त्या त्रुटी मधून या विषाणूंचा संसर्ग होत राहतो ...

आम्ही कित्येक कारखाने पाहिले आहेत की जिथे स्वच्छता महत्त्वाची नाही, दुर्लक्षितच. “आमच्याकडे काम करणारी माणसं आहेत, साफसफाई करायला लोकांना वेळ नसतो. ही थोडीशी घुळ राहिली, तर आपण साफ करायचं. त्यात काय ?” असा त्यांचा विचार असतो. प्रत्येकाने साफ करायला काहीच हरकत नाही. पण काही लोक अशी असतात की ज्यांना धुळीची अ‍ॅलर्जी असते. त्यांना साफ करायला लागलं, तर त्यांच्या हॉस्पिटलची बिले आपल्याला द्यावी लागेल, हे लक्षात घ्या. कोविडच्या वेळी तर यांच्यासह आपणास बाधा होते. व्हलनरेबल मेंबर्स (Vulnerable members) - कमजोर माणसं - ह्या गटात येतात. अ‍ॅलर्जी (allergy), बि.पी., मधूमेह अशीच काही दुखणी आहेत. त्यांची काळजी आपण घेतलीच पाहिजे. त्याच बरोबर साफसफाई करतात, त्या लोकांची आपण काळजी घेणे आवश्यक आहे. हा जरी काॅमन सेन्स् असला, तरी खूप कमी फॅक्टरीमध्ये याचा वापर दिसतो.

वॉशची माहिती आम्ही आमच्या वेबसाईटवर (https://www.zeninternational.systems/WASH) आहे. सर्वांना पाहता येईल. शिकताही येईल. त्रास असेल तर सुधारणा करण्यासाठी हे वापरा. हे सोपे नाही.... यासाठी हवी शिस्त...

जगात आपण कसं वागावं, हे बालवाडीतच मनाचे श्लोक शिकताना आपण शिकलो असतो. पण किती जण हे केव्हाच सोडून देतात. आयुष्यभर त्याचा वापर करतात का? खोटं बोलू नका. दुसऱ्याला दुखवू नका. प्रामाणिक रहा. ही सारी तत्त्व व्यवसाय करताना मागे पडतात का?

लवचिकता हा खूप महत्त्वाचा गुण व्यवसायिकांच्यात असलाच पाहिजे. कुठल्याही आघातांना खचून न जाता . पुन्हा नव्याने सुरवात करायची ताकद त्यांच्यात असलीच पाहिजे. त्यांच्यावर काही कुटुंब अवलंबून असतात. आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी फार मोठी ठरते. तिथे व्यवसायिकांनी आपला लवचिकता किंवा स्वतःला जाणून घेण्याची व संकटांवर उपाय शोधण्याची कुवत दाखवलीच पाहिजे. जर लोकांना कामावरून काढून टाकणं किंवा कमी पगार देणे - अशा काही उपायांचा वापर केला असेल, त्यांचा संस्थेच्या कर्मचारी सहभागावर याचा नक्कीच परिणाम होईल. सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेऊन या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण माझ्या एका ग्राहकाकडे वाईज बायोमेट्रिक सिस्टीमस् (WYSE Biometrics Systems)मध्ये मला पाहायला मिळाले. थंब रीडर बनवणारी ही कंपनी आहे. करोनामुळे आता कॉन्टॅक्ट टाळायचे तर कॉन्टॅक्टलेस (Contactless) उपकरण बदलून, त्यांनी फुकट आपल्या सर्व ग्राहकांना देऊ केले. त्यांच्याकडे त्यासाठी आवश्यक ते सॉफ्टवेअर तयार होतं. आणि यात काही जास्त हार्डवेअर लागतच नाही. त्यामुळे ग्राहकांची अपेक्षा पूर्ण करणारे, यापेक्षा उत्कृष्ट लवचिकता दाखवणारे उदाहरण असू शकत नाही. सहाजिकच चायनीज आणि कॉपी-पेस्ट करणारे जे उत्पादक होते त्यांचे पितळ उघडे पडले.

या कोविद-परीक्षेत वाईज बायोमेट्रिक सिस्टीमस् यशस्वी झाले आणि त्यांनी त्याचा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून दिला.

नाविन्यपूर्ण कल्पना सतत तुम्हाला यश देतात हे परत सिध्द झाले. यांच्या सहभागाने चर्चा सत्रानंतर सर्वांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेण्यास सुरुवात केली. शिस्त हा योगायोग नाही. कठोर परिश्रम आणि जिद्द, सातत्य याच्या मदतीने आपण काहीही यशस्वी करू शकतो . हे यातून परत एकदा सिद्ध झाले.

सर्वात आधी MCCIA ने या विषयावर व्याख्यान आयोजित केले. वाॅश आणि बिझनेस कंटिन्युटी या विषयावर आता बाकी प्रशिक्षण सुरू झाले आहेत.पण प्रथम येण्याचा मान MCCIA ने आम्हाला दिला आता त्यांच्या मदतीने या लेखातून तुमच्या समोर येण्याचा मार्ग मोकळे झाले. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून झालेली चर्चा खुप आवडल्याचे फीडबॅक, प्रश्न उत्तरे अश्या माध्यमातून कायझेन (Kaizen) म्हणजे नाविन्यपूर्ण सृजनशीलतेला वाव देणारे वेगवेगळी तंत्र आपण शिकून घेतले. जपान मध्ये कायझेनचा (Kaizen*) शोध लागला आणि मानवी आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळाली. काय (Kai) म्हणजे बदल आणि (Zen) झेन म्हणजे शहाणपणा वा सुधारणा. *(Change + Wisdom = Betterment). आयुष्याला आकार देणाऱ्या या जादूसम तंत्राचा उपयोग करून आपण आपले जगणे आणखी सोपे आणि सहज करू शकतो. हाच विचार मांडणाऱ्या पुढील 'वन मिनिट प्रिंसिपल' याचा आपण विचार करू.


करोनासारख्या अज्ञात संकटांवर मात करण्यासाठी, नुकसान करणाऱ्या वाया जाणाऱ्या घटकांवर उपाय शोधण्यासाठी, आरोग्याच्या चांगल्या सवयी जोपासण्यासाठी, या विचारांची तुम्हाला मदत होईल अशी अपेक्षा.

अर्थात सगळं मला समजते. हा तर काॅमन सेन्स् आहे असे म्हणतात त्यांना कोण काय सांगणार? ....

चेंबरच्या सर्व मदतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात हेन्केल, कात्रज डेअरी, रामॅलेक्स, वाईज बायोमेट्रिक सिस्टीमस्, कोरोकोट, आकार फाउंडरी, प्रॉम्प्ट सर्विसेस् यांच्यासारखे पुणे, नगर, औरंगाबाद येथील सहभागी झालेल्या सर्व संबंधितांची प्रतिक्रिया या कार्यक्रमाचे यश दाखवतात.सर्व आपल्या कामात एवढे व्यस्त होते तरी ही या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व संबंधितांनी मार्गदर्शन तसेच काही कारणाने सहभागी न होऊ शकलेल्यांच्यासाठी परत प्रशिक्षण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पुढील महिन्यात MCCIAने WASH वर ट्रेनिंग नियोजिले आहे.

हिंजवडी आणि जेजुरी दोन ठिकाणी कार्यरत असलेल्या संस्था हेनकेलच्या सहभागातून सर्टिफिकेशनच्या दिशेने पाऊल टाकतीलच, तर नगरचा वाटा दीपक जोशी सर, औरंगाबादचा वाटा पाटील सर उचलतील अशी आम्हाला आशा आहे. पुणे येथील गोंधळीसर आणि अवधूतसर यांनीही या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आणि लवकरच स्वतःबरोबर सर्व संबंधितांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्याची पावती, संपणारा करोना आणि वाढणारी सुरक्षितता , व्यवसाय-बिझनेस कंटिन्युटी आणि सर्टिफिकेट असणार हे नक्की. तेव्हा आरोग्य, यशोदायी आणि आनंदी सकारात्मक वाटचालीला मनापासून शुभेच्छा.

संस्थेच्या यशाचा मार्ग - अर्थात संधी आणि धोक्यांचे व्यवस्थापन

संस्थेचेचे निर्देशक अर्थात परिणाम दाखवणारे दोन महत्त्वाचे घटक सगळ्या स्टॅंडर्ड मध्ये म्हणजे मानकांमध्ये सांगितले जातात. एक आहे इफेक्टिवेनेस आणि दुसरा एफिशियन्सी आहे. त्यामुळे इफेक्ट अर्थात अपेक्षित परिणाम तसंच वास्तविक परिणाम काय आहे - याचा विचार होऊ शकतो. तुम्हाला केलेल्या कामाचा काय परिणाम मिळतो आणि तो अपेक्षित परिणाम मिळतील का तुम्ही ठराविक वेळी तपासून बघणे आवश्यक आहे. आणि तो परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही वापरलेली किती साधन, किती योग्य प्रकारे वापरणे म्हणजे काय नुकसान होत नाहीये ना हे तपासून बघणं आणि याचा विचार करणं कमीत कमी साधनांच्या मदतीने जास्तीत जास्त परिणाम मिळवणं म्हणजे झाली एफिशियन्सी. ही झाली तुमची कुवत. आता तुम्ही एखादं ऑर्डर किंवा एखादी मार्केट पेनेट्रेशन मिळवताना हे तुम्ही तपासून पहा. फक्त ऑर्डरचा विचार करण्यापूर्वी बऱ्याच वेळा आर्थिक गरज, ग्राहकांचे संबंध, संधी आणि अनुत्पादक काम नसल्यामुळे कमी किमतीत सुद्धा ऑर्डर स्वीकारली जाते, म्हणून प्रत्येक वेळी त्याच किमतीत ऑर्डर स्वीकारली जाईल असं नाही, किंवा परिस्थितीनुसार निर्णयावर परिणाम करणारे घटक बदलतात, म्हणूनच या बदलणार्‍या घटकांचा विचार करून आपले निर्णय बदलणे आवश्यक असते. आणि हे या संस्थेच्या प्रत्येकाला आणि त्यांचा या निर्णयात सहभाग आहे त्या सर्वांनाच माहिती असेल, तर परस्पर विश्वास आणि प्रयत्न एक निश्चित दिशेने त्यांचे काम चालू ठेवतात.पण जर इथे तडा गेला तर संस्थेच्या एकसंघतेला निश्चितच धोका असू शकतो. ऑटो सेक्टर म्हणजे वाहान उद्योगासाठी काम करणाऱ्या संस्था प्रकल्पाच्या किंवा प्रॉडक्ट च्या उत्पादकासाठी सुद्धा आणि FMEA, PPAP नियोजन करून आपल्या उत्पादनाचं मान्यता म्हणजे अप्रूवल मिळतात. या PPAP मध्ये आणि एफएमईए (FMEA) मध्ये अशाच धोक्यांचा आणि नियंत्रकाच्या योग्य ते नियोजन केलं जातं. होऊ घातलेल्या नुकसानाचा यापूर्वी घडलेल्या नुकसानाचा विचार करून त्याचे प्राधान्य सूची बनवणे होते.

जे उत्पादनाला लावता येतो ते तुमच्या सिस्टिम व्यवस्थापन पद्धतीला आणि प्रत्येक मकार म्हणजेच मेन, मेथड , मेटरियल , मशीन यांना लावता येतो .आणि त्यातल्या त्रुटी होऊ घातलेल्या त्रास आधीच ठरवला तर त्रास दूर करण्याची योजना किंवा काळजी त्रास होण्यापूर्वीच आपण घेऊ शकतो. थोडक्यात अत्यंत सकारात्मक अशी ही नियोजनाची पद्धती ज्याला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणजे प्रतिबंधात्मक योजनांच्या मार्गांनी तुमच्या संस्थेला भविष्याची दृष्टी देत असते. त्रास झाल्यावर त्याचा उपाय म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणणे ठरेल. आणि त्याच मुळे योग्य त्या वस्तू योग्य ती साधनं बरोबर घेऊन शक्य तितक्या कमीत कमी नुकसान व्हावं याचे नियोजन करून जेव्हा तुमचे उत्पादन तुम्ही ते करता त्यावेळी तुम्ही निश्चितच कमी खर्चात जास्तीतजास्त एफिशियन्सी जास्तीतजास्त परिणामकता साधलेली असते. जर काही दोष आढळला तर त्यात दोष का आला यावर विचार मंथन करून ,त्यातीलयोग्य त्या कारणांचा विचार करून, त्याचे मूळ कारण शोधून ते दूर करताना तुम्हाला सहज शक्य असते. उत्पादनाच्या किंवा व्यवस्थापनाच्या परिणामांचाही विश्लेषण करून, त्यात असलेले धोके ते अडचणी आणि संधी याच इतक्या जास्त आणि बारकाईने विचार केला जाईल , तितका जास्त आणि चांगल्या तऱ्हेने तुम्हाला फायदा मिळेल. अगदी संस्थेची व्यूहरचना म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असेल , या रोजच्या ऑपरेटर च्या कामाचे नियोजन , कुठल्याही पातळीवर नियोजन ही कामाची पहिली पायरी आहे. तर त्यातले धोके कमी होतात . आणि त्यात लपलेल्या संधी लगेच लक्षात येतात आणि याच पद्धतीने केलेलं काम तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. किमान काही अडचण आली, नुकसान किंवा अनिश्चितता आली, तर काय उपाय शोधायचा याची तुम्हाला आधीच तयारी असते, तुमचा प्लान किंवा पर्यायी योजना तयार असते. ज्या लोकांना योग्य ते उपाय शोधण्याची कुवत असते ते करावे ,आणि ज्यांना ही कुवत नसते त्यांनाही त्यांच्या ती कुवत निर्माण करावी हे संस्थेचे ध्येय असलं पाहिजे. उत्पादकता वाढते तसेच माणसातली विचार करण्याची कुवत ही त्यांनी वाढवली पाहिजे . हे खरं किंवा मानवी संसाधनांचे नियोजन. आमच्या इथल्या लोकांना डोकं नाही किंवा आमची माणसं सांग कामे आहेत. हे म्हणणं म्हणजे मी एक नेता म्हणून अपयशी आहे असं म्हणण्यासारखं आहे. त्या माणसांकडून , त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या डोक्याचा, त्यांच्या भावनांचा आणि हाताचा वापर जर मी करू शकलो नाही तर मी गुरांबरोबर काम केलेला काय वाईट? एक सुंदर उदाहरण एका कवितेत मी वाचलं होतं - रामायण वाचुनिया नंतर बोध कोणता घ्यावा आपण रामासम मिळता नायक वानर ही मारती रावण. तो इंद्राला पराभव करून देवांनाही जिंकणारा होता. आणि रामाच्या नेतृत्वाचा हे वैशिष्ट केवळ माकडांच्या मदतीने त्यांनी रावणाला मारले. बऱ्याच वेळा आपल्या संस्थेत आपण माणसांची माकडच करत नाही हे आपण तपासून बघणे आवश्यक आहे. हे बघू नका हे बोलू नका हे ऐकू नका हे संस्थेच्या दृष्टीने किती लावायचं कुणाला लावायचा आणि कसं लावायचं याची मी त्याला कळते त्यालाच कुठल्याही परिस्थितीत यश मिळेल.

योग्य सुधारणा योग्य नियंत्रण आणि संसाधनांचा वापर करून योग्य प्रकल्प राबवणे इम्पलेमेंटेशन्स हे सातत्याने तुम्ही करत राहिलात तर माणसांची सुधारणा तर होतेच होते , पण व्यवसायाची सुधारणा निश्चित होत, किमान त्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुमचा व्यवसाय तयार होतो, हे तुमच्या हातात आहे .संधीच सोनं करण किंवा आलेल्या अडथळ्यांना घाबरून पळत सुटणे तुमच्या हातात आहे. आत्म व वचना आणि किंवा माझं चुकलं, मला जमत नाही ,मला यश नाही ,मला माणसांची साथ नाही, हे सगळं बघताना , मला कुठल्या संधी मिळाल्या त्याचाही विचार करणं आवश्यक असतं. काऊंट युवर ब्लेसिंग. तुम्हाला मिळालेल्या संधी वर जेव्हा तुम्ही विचार करायला लागतात , तेव्हा अडथळे खूप लहान वाटायला लागतात आणि अशी उदाहरणे आपल्याला इतिहासात अनेक वेळा सापडतील. कर्मचारी ग्राहक पुरवठादार आपली साधन या सगळ्याचा विचार करून योग्य दिशेने टाकलेली पावलं आपल्या संस्थेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. आपल्या वेगळ्या कुवतीनुसार ध्येया नुसार आपली गती असते. दुसऱ्या कोणीतरी काहीतरी केलं म्हणून आपणही ते करावं हे बरोबर नसते आणि त्याच मुळे मी आत्ता या क्षणी काय करावं हे ठरवणं महत्त्वाचं, तितकच दुसऱ्यांनी काय करावे हे ठरवण्याची कुवत याच्यावर निर्माण करणेही महत्त्वाचे आहे, बस अशी माणसं घडली संस्था अग्निपंख लिहून झेपावणारे फिनिक्स सारखे राखेतून उभे करू शकतात. तुम्ही उभे राहू शकते हे चमत्कार जपानमध्ये करून दाखवले आणि ते घराघरातुन दारातून प्रत्येक संस्थेतून व्हावं यासाठी हा सारा लेखन प्रपंच बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपले दोष स्वीकारायला तो स्वतःला आपण लेबल लावून मोकळे होतात आणि मग बाहेरच्या कुणीतरी येऊन आपल्याला सांगावं लागतं अरे जमेल तुला. प्रयत्न तर करून टाक. त्यामुळे या नियोजनात ,प्लॅनिंगमध्ये योग्य त्या मार्गदर्शकाचे सहाय्यक म्हणून महत्त्वाचे स्थान असतं. आवश्यक त्या सर्व सहकाऱ्यांबरोबर आपल्या व त्यांचा कामाचं आढावा आपण स्वतः घेता सगळ्यांच्या विचारांनी घेत नाही. आपल्या लक्षात न आलेल्या पण आवश्यक असे मुद्दे आपल्या लक्षात न आलेले दोष बलस्थानं सहजपणे दुसरी लोक आपल्याला सांगू शकतात .आपल्या नजरेआड असणारा महत्त्वाचा मुद्दा आणि आपल्या संस्थेच्या भवितव्यासाठी आवश्यक असा मुद्दा त्यामुळे सगळ्यांच्या विचारमंथनातून ही संधी आणि मग अत्यावश्यक आणि अत्यंत महत्त्वाचे असे प्रधान्य सूची बनवणे आवश्यक आहे बदलत्या काळात ही सूची बदलत असतात किंबहुना तुमच्या कृतीने तुम्ही ती बदलली पाहिजे. जितक्या योग्य तऱ्हेने तुम्ही भविष्याचा अंदाज किंवा आढावा घ्याल, तितक्या प्रमाणात तुमची संस्था प्रगतीच्या दिशेने जाईल हे निश्चित. ज्या कोणी भविष्याची चाहूल घेतली नाही त्या संस्था काळाच्या ओघात डायनासोर सारखे नष्ट होतात. सुद्धा अशा अनेक संस्था आहेत बदलाच्या आधीच खूप चांगलं उत्पादन काढलं होतं. पण बदलत्या तंत्रज्ञानाच्या बद्दल बरोबरीने त्यांना बदलता न आल्याने ती संस्था बंद पडली. त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही बदल करू शकता, परिस्थितीशी जमवून घेऊ शकता इतक्या लवकर तुम्ही पुढे जाऊ शकता. लवचिकता आणि माहिती नियोजन म्हणजेच नॉलेज मॅनेजमेंट संस्थेचे महत्त्वाचं ठरते अर्थात बाहेरचे मुद्दे पण लक्षात घ्यावे लागतात.

जोखीम म्हणजेच रिस्क किंवा अपॉर्च्युनिटी अर्थात संधी याचे व्यवस्थापन प्रत्येक संस्थेला अत्यावश्यक आहे. जोखीम शोधताना त्या संस्थेचे उद्दिष्ट त्या संस्थेत संबंधितांच्या अपेक्षापूर्ती करण्यात येणारे अडथळे करताना हे अडथळे पार करताना येणारे अडथळे तसेच काही सुप्त धोके, जसे काही संस्थेची माहिती दुसऱ्याच्या हाती लागणे ज्याला आपण सायबर सिक्युरिटी म्हणतो ती महत्त्वाची माहिती विकली जाणे यासारखे अनेक घोटाळे किंवा सायबर क्राईम्स असे घटक येतात . काय नियंत्रण लावतो आणि ते कमी करण्यासाठी काय सुधारणा करतो .हे लक्षात घेणे आवश्यक आहे एखाद्या संस्थेत उपलब्ध साधनआणि कमतरता या सगळ्याचा विचार करून नियोजनाचे मुद्दे किंवा आराखडा ठरवला जातो. मानवी संसाधनांचा योग्य वापर किंवा नुकसानाचा आढावा नाव घेणे हा सुद्धा धोका असू शकतो एखाद रिसोर्स किंवा साधनाचा गैरवापर करणं हा ही धोका असू शकतो. कुठल्याही प्रकारचा धोका असला तरी त्याच्यावर योग्यअशी उपाययोजना न झाल्यास त्या संस्थे च्या अस्तित्वाला गंभीर धोकाठरू शकतो. याउलट हा धोका ओळखून योग्य उपाययोजना केल्यास संस्थेचा फायदा होतो. किमान त्याचे स्थैर्य आणि प्रगती निश्चित होऊ शकते .या साऱ्या संधि आणि हे सारे धोके सारखे बदलत असतात. आपल्या संस्थेअंतर्गत तसेच बाहेरच्या परिस्थितीनुसार डायनॅमिक्स किंवा बाहेरच्या घटकांवर हे मुद्दे अवलंबून असतात. आणि संदर्भ बदलत असल्यामुळे ठराविक अंतराने परत एकदा या संधींचे सिंहावलोकन करणे , आवश्यक ते मॅनेजमेंट म्हणजे त्रास कमी करून संधी वाढवणे आवश्यक असतात. प्रत्येक धोक्यात संधी असते आता तो त्रास दूर करून किंवा त्याचा परिणाम कमी करणे ही संधी असते . तर प्रत्येक संधी मध्ये काही त्रास असू शकतो असेलच असं नाही . कागदांचा वापर कमी करणे तसेच माहितीचे संगणकीकरण हा नैसर्गिक साधनांच्या दृष्टीने संधी ठरू शकते .पण किंवा कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन किंवा क्लाउड या सगळ्याचा वापर करताना डाटा सिक्युरिटी म्हणजेचमाहिती नियंत्रण हा फार मोठा धोका असू शकतो. या साधनां ना त्यात आवश्यक असलेले नियंत्रण लावून, आपण धोका कमी करू शकतो .माणसांच कौशल्य वाढवणे आणि योग्य ती उपकरण नियंत्रित ठेवणे त्याचा योग्य प्रकारे वापर संस्थेला आवश्यक असतं, पण सहभाग न घेणारी माणसं संस्थेला फार मोठा धोका ठरतात. जर संस्थेला प्रगती किंवा प्रॉफिट वाढवायचं असेल तर ती संधी शोधण्यासाठी चार एम (4 M) अर्थात मेन मटेरियल मेथड मशीन तसेच यांच्याबरोबर येणे वाया जाणारे नुकसानाचे घटक याचं शोध आवश्यक ठरतो. आणि कुठलाही धोका संस्थेच्या अंतर्गतअसेल किंवा संस्थेच्या बाहेरचे असेल त्याचा विचार करणे आवश्यक ठरते. यानुसार रचना करून अर्थात ठरवून संस्थेचे पॉलिसीमध्ये म्हणजेच धोरण, ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच ध्येय निश्चित केल्याने संस्थेची दिशा ठरते. त्यावेळी त्या संस्थेला एक विचारांचा गाभा मिळाला असतो ठरवल्याप्रमाणे सारे होतंच असं नाही पण निदान नाही झालं तर काय चुकलं हे लक्षात घेण्यासाठी काही वेळा संदर्भ त्यांच्या हातात असतात आणि त्याचमुळे कमी पडते तेथे योग्य ती उपाययोजना करून सगळ्यांच्या विचारांनी म्हणजे कोणाची तरी लहर म्हणून नाही सगळ्यांच्या विचारांनी पुढे जायचे निश्चिती संस्थेला जमून जाते. एक पारदर्शक किंवा ट्रान्सपरंट आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच व्यक्तिनिरपेक्ष असं संस्थेचे कामकाज करायचं असेल तर सिस्टीम आणि डॉक्युमेंटेशन - पद्धत आणि माहिती याला पर्याय नाही .फक्त ही पद्धत ठरवताना महत्त्वाचे मुद्दे संधी आणि धोके हे लक्षात घेतलं पाहिजे .आणि ते लक्षात घेणारी माणसं त्यांचं कौशल्य योग्य ते नियंत्रण हे जर आपण विचारात घेतलं आणि त्याचा पुन्हापुन्हा आढावा घेतला, तर येणारे धोके कमी करून संधी वाढवणे शक्य होत. बऱ्याच वेळा माझ्या हातात काहीच नाही अशी भावनाही येते, पण या वेळी काहीही कृती न करता योग्य वेळ येईल तोपर्यंत आपल्या साधनांना धार लावणे योग्य आहेस असं म्हटलं जातं. त्या साधनांना धार लावून योग्य संधीची योग्य वेळेची वाट बघत राहणं कमी निराशाजनक असतं. आणि म्हणूनच योग्य तिथे माघार घेणार ही संस्था संधी मिळताच मी उफाळून वर येते. आणि तिचे सातत्य चालू राहते. संस्थेची उपाय योजना किंवा नियोजन हा जरी वरिष्ठ पातळीवर मॅनेजमेंट विषय असलं तरी सर्वसामान्य व्यक्ती ही त्याच्या कामासंदर्भात योग्य ते नियोजन केल्यास डेमिंग चक्रानुसार यांचे याचा वापर केल्याने प्रत्येक कामात व्यावहारिक पातळीवर असेल किंवा मानसिक पातळीवर असेल सुधारणा चक्र चालू राहते .आणि नकारात्मक तसेच अनिश्चितता कमी झाल्यामुळे कामातला सहभाग कामाचा उत्साह वाढतो.आणि एक दिशा धरून चालत राहिल्याने आलेली एकसंघता संस्थेला फार महत्त्वाची ठरते. प्रत्येक संस्थेचे प्रत्येक व्यक्तीचं सातत्य सुधार करण्याचे ध्येय संस्थेला एका वेगळ्या पातळीवर नेऊ शकते. फक्त बऱ्याच वेळा हा विचार करण्याचं काम कोणी करायचं कधी करायचं याचा विचार केला जात नाही .मला वाटतं विचार न करता फक्त गोंधळ होतं . ज्यावेळी तुम्हाला योग्य संधी उपलब्ध नसेल, तेव्हा त्यांनी परत एकदा आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. काय केल्याने आपल्याला संधी मिळेल याचा सकारात्मक विचार आपल्या सहकाऱ्यांना घेऊन केला पाहिजे. आणि सगळ्यांचे विचार चर्चा यातून योग्य ती संधी शोधून, त्याच्यासाठी धडपड करून तिचा फायदा करून घेतला पाहिजे. बाहेरच्या गोष्टी किंवा बिजनेस नेहमीच आपल्या हातात नसतं ,पण आपली माणसं त्यांची मनोभावना आणि त्यांच्याशी असलेले संबंध हे शंभर टक्के आपल्या सतत असतात. आणि म्हणून उच्च व्यवस्थापनाची जबाबदारी ठरते, सगळ्यांच्या सहभागाने योग्य ते संधी अनेक धोक्यांचा विचार करून त्यावर योग्य ते उपाय योजना करायचे ,असे ठरवले की त्या संस्थेला त्यांची व्याप्ती तसेच कामाची पद्धत आणि प्रक्रिया निश्चित करणं खूप सोपं आहे. पण हे न करता तुम्ही जर प्रक्रिया निश्चित करायला लागलात म्हणजे त्या कंपनीत असता म्हणून आपण असं करायचं , हे कॉपी पेस्ट डॉक्युमेंटेशन दुसऱ्याचा विचार किंवा माहिती पण कॉपी करायचं ठरलं तर मात्र फार गडबड होते जशी दुसऱ्याचे कपडे कसे तुमच्या अंगाला येत नाहीत, दुसऱ्याचे चष्मा वापरून तुम्हाला स्पष्ट वाचता येत नाही तसंच काहीसं आहे .जेव्हा जेव्हा तुम्हाला नकारात्मकता किंवा यश मिळत नाही असं वाटतं , तेव्हा तेव्हा हे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या बरोबर तुमची माणसं ही पुढे चालायला लागतात आणि निश्चित ज्याचं मन चांगल्या विचारांनी, ध्येयाने भारलेलं आहे त्याच्या पाठीशी परमेश्वर असतो.सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर म्हणतात तो हाच. चला तर आजपासून निश्चय करूया बाहेर किती त्रास ह्यापेक्षा माझे ध्येय किती शुद्ध आहे माझ्याबरोबर माझ्या माणसांचा किती विश्वास आहे आणि माझ्या दे अशी माझी किती बांधिलकी आहे याचे उत्तर जर शंभर टक्के असतील तर कुठलीही अडचण तुमचा मार्ग रोखू शकणार नाही आवश्यकता आहे फक्त संधी आणि धोके यांच्या नियोजनाची आणि त्यासाठी आवश्यक असेल व तंत्र समजून घेण्याची. धन्यवाद.

ZED च्या वाटेवर - WASH आणि BCMS

२०१४ साली १५ ऑगस्टला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी प्रथम झेड (ZED) म्हणजे झिरो डिफेक्ट आणि झिरो इफेक्ट ही संकल्पना मांडली. दोषरहित अर्थात निर्दोष आणि अपायरहित असे उत्पादन किंवा सेवा या योजनेतून अपेक्षित आहे. या संकल्पने अंतर्गत कुठल्याही संस्थेत केलेले उत्पादनाच्या किंवा सेवेच्या पूर्तीसाठी कमीतकमी दोष अगदी निर्दोष परिपूर्णता अपेक्षित आहे. म्हणजे झिरो डिइफेक्ट.

आणि कमीत कमी पर्यावरणावरील नकारात्मक परिणाम म्हणजे शून्य अपायकारक परिणाम झिरो इफेक्ट मधून त्यांना अपेक्षित आहे.

शून्यातून ब्रह्मांड शोधणाऱ्या भारतीय वृत्तीला साजेल असा हा विचार होता. आणि सहाजिकच पंतप्रधानांच्या उद्दिष्टानुसार एक समिती स्थापन केली गेली. २०१७ पर्यंत काही संस्थांमध्ये प्रयोग करून झेड मॉडेल त्यासाठी आवश्यक ट्रेनिंग, आणि लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाले . या वेबसाईटवर मिळणाऱ्या साऱ्या फायद्यांची एक लांबलचक यादी दिसते. त्याच बरोबरीने अनेक मुद्द्यांवर प्रशिक्षण देणारी माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पण लक्षात कोण घेतो - मला वेळ नाहीये ही वृत्ती सगळ्यांचीच असते. गळ्याशी आल्या शिवाय वेळ काढायचं नाही, हा आपल्या आयुष्यातही आपल्या ला अनेक वेळा आलेल्या अनुभव. अगदी या वर्षाच्या सुरुवातीला झेड संदर्भात मी जेव्हा कोणाला फोन करायचं तेव्हा - "मार्च होऊन जाऊ देत, तोपर्यंत आम्हाला अगदी म्हणजे अगदी वेळ नाही" - अशी उत्तर अगदी नेहमी ऐकायला मिळायची. जणू काही तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा शेवटचा हा कार्यकाळ दुसऱ्या कशासाठी वापरणं त्यांना मान्य नव्हते. असा त्यांचा एक जानेवारीपासून एकाग्र होऊन बिलिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू असायचा. अचानक ट्वेंटी-ट्वेंटी (२०२०) या वर्षांने सगळ्यांना धडा शिकवला. ‌‌ मार्च सोडूनच द्या, एप्रिल गेला, मे गेला ... जूनमध्ये थोडीफार कामाला सुरुवात झाली. सुरुवात ही अत्यंत दडपणाखाली किंवा दहशतीखाली झाली होती - कामगार यायला तयार नव्हते. आणि यां रोगाची काय प्रतिबंधक योजना करावी ? कोणत्या कोणत्या धोक्याविषयी काय काय उपाययोजना करायच्या? हे व्यावसायिकांना पुरेसं ठाउक नव्हतं. की समजतही नव्हतं. कोणी काय, तर कोणी काय उपाय सुचवत होते. बघता बघता दिवस कसे गेले हे कुणालाच कळले नाही. संसर्ग वाढतच होता. कोणाच्या जीवाशी खेळ नको, म्हणून सर्व तयारी बरोबरीने करून घ्यायच ठरवले तरी वाट सापडली नव्हती.

QCI (क्वालीटी कॉन्सिल ऑफ इंडिया) या संस्थेने WASH (वर्क प्लेस असेसमेंट फार सेफ्टी आणि हायजीन) म्हणजेच कार्यक्षेत्रातील सुरक्षा आणि शुचिता- आरोग्य पूर्ण स्वच्छता हे स्टँडर्ड पोर्टलवर प्रसिद्ध केले.

स्वतःच्या कारखान्यासाठी किंवा सगळ्यांच्याच आरोग्यासाठी कुठले नियम पाळावेत, हे सांगणारे मानक - स्टॅंडर्ड उपलब्ध करून दिले आहे.

पंधरा घटकांच्या मदतीने सगळ्यांच्या आरोग्यसाठी घ्यायची काळजी WASH मध्ये व्यवस्थित दिली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने सगळ्या सरकारी खात्यात आता याचा वापर करावे असे नोटिफिकेशन काढले आहे, पण मला वाटतं स्वतःच्या कामगाराची स्वतःची, पुरवठादारांची, अभ्यागतांची- व्हिजीटरची काळजी घेण्यासाठी किमान स्वतःच्या व्यवसायाची काळजी घेण्यासाठी सूची किंवा सेल्फ असेेसमेंट चेक लिस्ट (Self assessment checklist) वेबसाईटवर सहज मिळत असेल, तर वापरायला काय हरकत आहे? आणि जर आपण स्वतः एवढे सगळे कष्ट घेतलेत तर त्याची एक परीक्षा किंवा असेेसमेंट दुसऱ्याकडून घेऊन एक चांगल्या तरी प्रमाणीकरण किंवा रिपोर्ट मिळवायला काय हरकत आहे?

बघता बघता कार्यस्थळाची स्वच्छता आणि सुरक्षितता हा विषय ऐरणीवर आला आहे. आता तुम्ही विचार करता त्यावेळी तुमच्या कार्याची कुठल्याही आघातामुळे किंवा काम थांबणाऱ्या घटकांपासून त्रास न होण्यासाठी, तुम्ही काय उपाय योजना केली आहे हे तपासण्यासाठी, तुमच्या मिळालेल्या फायद्यामध्ये सातत्य आहे का हेही पाहा.

या साऱ्या गोष्टी तुमच्या नियोजनाचाच भाग आहे . झेड मधे ही या बाबी पाहिल्या जातातच. तसेच या प्रत्येकासाठी वेगळी मानक किंवा स्टॅण्डर्ड आहेत. प्रत्येेेकाच वेगळे काम करणे अपेक्षित आहे . पण प्रत्येक वेळी वेगळ्या वेगळ्या सर्टिफिकेट करण्याऐवजी सगळ्यायाच विचार करणारी मालिका किंवा परीक्षण पद्धती म्हणून झेडचा विचार करणे सगळ्यांनाच खूप सोयीचे आहे.

कारखानदारांना खिळवून टाकणा-या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यात त्यांचा वेळ जाणार आहे . किंवा त्यासाठी खर्च करावा लागणारा पैसा आणि वेळ ही प्रथम गरज नसल्यान झेडचा विचार काहीसा मागे पडला. क्वालिटी कॉसिलं ऑफ इंडिया (QCI) या संस्थेने इम्पलेमेंटेशन अथोरिटी किंवा हे मॉडेलं कार्यवाहीत आणण्याची, प्रशिक्षण, मॉडेलं तपासणी करण्यासाठी जबाबदारी घेतली होती. एकतीस मार्च दोन हजार वीस रोजी, त्यांचा तीन वर्षाचा करार - कॉन्ट्रॅक्ट संपला आहे .सध्या या वेबसाईटवर नवीन परीक्षणे - असेसमेंट थांबलेल्या आहेत, झेड कुणाच्या हस्ते कसे हाताळता येईल - यावर मंत्रालयाची सही बाकी आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स (MCCIA) यासारख्या संस्था आता पुढाकार घेऊन याची कार्यवाही करतील अशी आशा आहे. आणि त्यादृष्टीने मराठा चेंबर तर्फे ही मालिका आयोजित केली आहे.

झेड ही काय संकल्पना आहे हे समजून घेणं या पार्श्वभूमीवर आवश्यक ठरले. आणि पुढचे चारही दिवस आपण या विषयावर चर्चा करणार आहोत.

उद्योजकांना स्वतःची प्राधान्यसूची निश्चित करण्यासाठी काही मदत मिळावी. त्यांचं नुकसान थोडं कमी व्हावे. आणि त्यांना मार्गदर्शन मिळून त्यांना योग्य प्राधान्य सूचना बनवण्यात, अर्थात सफळ उद्योगासाठी , सुरक्षितता निर्दोष , अपाय रहीत उत्पादनाच्या कार्यवाहीत मदत व्हावी, हा या भाषण मालिकेचा उद्देश.

स्वतःची प्रधान्यसूची निश्चित न करता आल्याने इतकी महत्त्वाची माहिती कुठल्यातरी कोपऱ्यात पडून नुकसान उठवत, परिस्थितीला दोष देण्यात जाणारा वेळ या माहितीच्या मदतीने प्रगत कडे जाण्यासाठी वापरावा. आता ही माहिती प्रत्येक कारखान्यात, प्रत्येक सेवेत पोचवून , त्याचा फायदा प्रत्येकाला मिळावा या उद्देशाने ही भाषण मालिका आपण सुरू केली आहे.

आज पर्यावरणावर परिणाम सगळ्यात पहिल्यांदाना समजले आहे.

अपार राहीत झिरो इफेक्ट कारखान्यांच्या संबंधित समजून घेरू. यात अपाय म्हणजे पर्यावरणावर घातक परिणाम, प्रदुषण कचरा आदींचा पर्यावरणावर होणारा विचार अपेक्षित आहे. परिणाम म्हणजे काय? यात हवा पाणी जमीन याच्यावर घातक परिणाम करणारे घटक येतात. जसे की धूळ, धूर, आवाज, कचरा आणि कारखान्यातून सोडले जाणारे प्रदूषित पाणी वा वायू, नैसर्गिक वा अन्य साधनांचा गैरवापर. याचा विचार अपायकारक परिणामां मध्ये येतो. यात कसे नियंत्रण करावे हे विचार केले जातात. हे सारे घटक केवळ आपल्याच कारखान्यात पुरते आपण पाहणे पुरेसे नाही.आपल्यासाठी काम करणाऱ्या, म्हणजे आपल्या पुरवठादारांच्या कामातूनही, जेव्हा असे पर्यावरणाला त्रास देणारे घटक निर्माण होतात, तेव्हा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आपलीच असते.

पर्यावरणावर कमीतकमी परिणाम होऊन आपण जास्तीत जास्त चांगलं काम कसं करावं याचा विचार झेड या माध्यमातून प्रत्येक संस्थेने करावा असं पंतप्रधानांना अपेक्षित होतं.

थोडक्यात आपल्या कामाचं नियोजन, काम करताना घ्यायची योग्य ती काळजी किंवा नियंत्रण, काम करून झाल्यावर केलेली तपासणी, किंवा आढावा आणि या सगळ्यातून मिळालेल्या अडचणींवर केलेली उपाय योजना म्हणजे सुधारणा, या डेमिंग चक्र (Deming Cycle) किंवा पिडीसीए (PDCA)चा विचार या मॉडेलमध्ये केला गेला आहे.

या तपासणीमधै आपण तयार केलेल्या कागदपत्र आणि पुरावे याची बारकाईने पाहणी करून योग्य ती पातळी ठरवली जाते. आपल्याला प्राप्त पातळीचे सर्टिफिकेट, तसेच पुढे काय करायचं याचा रिपोर्ट दिला जातो. संस्थेला पुढे काय काम करता येईल किंवा कुठल्या दिशेने जाताशंश येईल किंवा संस्थाचालकांनी पुढील वाटचालीस कशी करावी, याचे पूर्ण मार्गदर्शन या रिपोर्टमध्ये असते.

झेड चे वैशिष्ट्य असे आहे, की यावर खर्च केलेला प्रत्येक रुपया आपल्या देशात राहतो. आयएसओ (ISO) ९००१, १४००१, ४५००१ हे प्रमाणपत्र देणाऱ्या अनेक संस्था परदेशी ओरिजिन - मुळात परदेशी असल्याने, त्यावर केलेला खर्च बहुतेकदा परदेशात जात असतो. झेड हे भारतीयांनी भारतीयांसाठी केलेले , भारतीय मानक असल्यामुळे यावर खर्च केलेला प्रत्येक पैसा भारतातच राहतो. इतर सर्टिफिकेशनप्रमाणे आवश्यक ते सारे घटक या तपासणीत अध्याहृत असल्याने असल्यामुळे बऱ्याच वेळा वाचून, आपले पैसे परदेशी जात असतील तर ते थांबवून, आपल्याला झेड च्या माध्यमातून सहज मानांकन मिळवणे शक्य आहे. झेड ची माहिती कारखान्यांना देण्यासाठी जाणीव प्रशिक्षण किंवा अवेरनेस ट्रेनिंग (Awareness Training) मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. यानंतर जर झेड बद्दल आपल्या मनात उत्सुकता निर्माण झाली तर त्यासाठी आपल्या संस्थेचे रजिस्ट्रेशन किंवा नोंद करून देण्याची सगळी प्रक्रिया निशुल्क आहे. आणि त्यामुळे प्रत्येक संस्थेने यात सहभागी व्हावं असे एक आवाहन या माध्यमातून आम्ही करतो आहोत. नोदणी-रजिस्ट्रेशनसाठी फक्त तुम्हाला उद्योगाधार किंवा कुठलेही संस्थेच्या नोंदणीचे कागदपत्र असणे आवश्यक आहे. नसल्यास त्याची नोंद निःशुल्क करता येते. संस्थेची माहिती त्यात लिहिली जाते, आणि त्यानुसार म्हणजे तुमच्या संस्थेच्या सेक्टर कोड नुसार योग्य त्या प्रश्नाकडे तुम्हाला जोडून दिल जाते. उदाहरणार्थ अन्नपदार्थ निर्माण करणाऱ्या कारखान्याचे प्रश्न वेगळे असतात. केमिकल उत्पादकांचेच प्रश्न वेगळे असतात, तर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांचे प्रश्न वेगळे असतात. तुमच्या विभागानुसार त्या विभागाला अनुसरून काही विशिष्ट प्रश्न त्यात विचारले जातात आणि त्यात डिसिप्लिन स्पॅसीफिक (Discipline Specific) म्हणजे आपल्या उत्पादनानुसार अत्यावश्यक प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्या नुसार होते.याला सेल्फ असेसमेंट म्हणतात. योग्य उत्तरे देणे ही आपली जबाबदारी आहे. रजिस्ट्रेशन करणे केल्यावर योग्य ती काळजी घेऊन आपल्या सोयीनुसार किंवा आवश्यकतेनुसार सेल्फ असेसमेट (Self Assessment) - स्वतःची पडताळणे तुम्ही ऑनलाइन करू शकता. आवश्यक असल्यास तुम्हाला, म्हणजे संस्थेला तुमच्या सध्याची पातळी तपासून बघण्यासाठी किंवा स्वतःचं अजून शिक्षण करण्यासाठी झेड च्या पोर्टलवर अनेक छोटे-छोटे स्वयम अध्ययनाचे नॉलेज पोर्टल (Knowledge Portal) आहे. याचा वापर आपल्या कामाच्या सोयीनुसार आणि सवडीनुसार आपण स्वतःचा अभ्यास करण्यासाठी करु शकतो. आपण स्वतः केलेल्या चाचणीत म्हणजे self-assessment मध्ये आपल्याला 2.5 पेक्षा जास्त मार्क पडल्यास स्वतःच्या उत्तरांचे पुरावे डेेस्कटॉप असेसमेंंट मधून तपासण्यासाठी देण्यात यावेत . जर कमी गुण मिळाले तर परत अभ्य्यास करण्यासाठी पोर्टलवर जा. हा अभ्यास निशुल्क उपलब्ध असल्यामुळे जास्तीत जास्त संस्थांनी याचा फायदा करून घ्यावा.

ज्या संस्थांना याच्या पुढे जाऊन स्वतःचं नाव गव्हर्मेंट ऑफ इंडिया च्या वेबसाईटवर यावं , आणि देश परदेशातल्या अनेक संधी आपल्याला मिळाव्यात असं वाटत असेल त्यांच्यासाठी काही नाममात्र शुल्क भरून डेस्ट टाप असेसमेंट किंवा कागदपत्रांची पडताळणी ही पुढची पायरी आहे. बाराशे रुपयापासून जास्तीत जास्त पाच हजार रुपये पर्यंत त्याला खर्च येतो. अर्थात या खर्चामध्ये तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून तुम्ही आत्तापर्यंत केलेलं काम हे खरंच जागतिक दर्जाच्या परीक्षेला बसणार आहे का हे तपासले जाते. यात सुद्धा तुम्हाला 2.2 च्या वर मार्क मिळाले तर तुमच्या आणि असेसर यांच्या सोयीने योग्य अशी साइटवर किंवा कार्य स्थळा पडताळणी करण्याची पुढची पायरी आहे.आणि त्यासाठी आवश्यक असलेले बारा हजार ते चाळीस हजार पर्यंत तुमच्या संस्थेच्या स्केल नुसार म्हणजे मायक्रो , स्मॉल , मीडियम यापैकी कुठल्या गटात तुम्ही मोडता, त्यानुसार पैसे, तुम्हाला भरावे लागतात. या पैशात कुठलाही जास्तीचा आकार म्हणजे तपासणी करणाऱ्या असेसरचे राहाण्याचे, फ्लाईटचे, प्रवासाचे पैैैसे न लावता, दोन असेसर, दोन दिवसासाठी तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात.

या असेसर् मध्ये एक पर्यावरणाचा तज्ञ - एक्सपर्ट आणि एक गुणवत्तेचा तज्ञ असतो. आणि ते तुमच्या दारात आल्यापासून त्यांना जिओ-टॅगिंग (Geo-tagging) असल्यामुळे त्यांची वेळ, त्यांची जागा मशीन तर्फे क्यूसीआयला (QCI) कळवत राहिली जाते, त्यामुळे असेसमेंट किंवा ऑडिट झालंच नाही असं कधी होत नाही. ऑडिटरने कुठल्या प्रश्नावर किती वेळ दिला. आणि आणि त्यांनी घेतलेला निर्णय कुठल्या पुराव्यावरून आला, त्याचे पुरावे फोटोंमध्ये अपलोड केले जातात. कुठला फोटो आणि कुठली माहिती तपासली याचे पुरावे त्यांना तातडीने ऑफिसला पाठवावे लागतात. हही तपासणौ एड्रॉइड मॉडेल वर आधारीत असते .हे मॉडेल अँड्रॉइडच्या फोन मध्ये असतं, फोनचा वापर करून या पुराव्यांचे फोटो असेसर सातत्याने अपलोड करत राहतात. हे घेतलेले सगळे फोटो असेसमेंट झाल्यावर त्यांच्या फोन मध्ये न राहता अपलोड झाल्याने , एकही फोटो त्याच्या जवळ उरत नाही . म्हणजे तुमच्या माहितीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली जाते . आणि तसेच तुम्हाला कुठलीही पातळी का दिली गेली आहे याचे सगळे पुरावे तुमच्या रिपोर्टमध्ये अगदी व्यवस्थित तुम्हाला सांगितले जातात. ही व्यक्ती निरपेक्ष आणि पुराव्यांवर आधारित तपासणी आणि सर्टिफिकेट मिळण्याची पद्धती आहे. योग्य ते असेसमेंट झाल्याचा निष्कर्ष खात्रीशीर पुराव्यांवर आधारित असल्याने आणि त्याच मुळे कमी असेल तर काय आणि का कमी, आणि आता पुढे काय करायचं याचा एक आराखडा संस्थेकडे तयार होतो. आजवर भारतात फक्त दोन संस्था डायमंड किंवा हिरक पातळीवर पोहोचलेल्या आहेत.

हीरक किंवा प्लॅटिनम या पातळ्या जागतिक दर्जाच्या समजल्या जातात. गोल्ड, सिल्वर, ब्राँस मिळणाऱ्या अनेक संस्था आहेत.काही संस्थांना 2.2 पर्यंत न जाता आल्यामुळे कुठलाही सर्टिफिकेट नाही . यांना मानांकन न मिळाल्यास, कारणे व रिपोर्ट मिळतो . आता त्या संस्थेने थोडी काळजी घेतली नाही तर मानांकन होणार नाही हे नक्कीच, अशा संस्थांना योग्य सल्लागाराची मदत ही देण्यात येत आहे. सर्वसाधारण सल्लागाराचा खर्च दोन लाखाच्या घरात असतो. त्यावर काही तुम्हाला परतावा मिळण्याची शक्यता असते . पण स्वतःच्या स्वतः अभ्यास करून आवश्यक तेव्हा सल्लागाराची मदत घेऊन स्वतःच्या स्वतः बदल घडवून आणणे किंवा स्वतःच्या व्यवसायाला योग्य ती प्रणाली/सिस्टीम बसणं यात आवश्यक आहे. ही योजना जाहीर केले तेव्हा असं अपेक्षित होतं अत्यंत थोड्या वेळात २२२२२ पाच वेळा 2 इतक्या संस्था नोंदणी करून प्रमाणपत्र मिळतील आणि त्यासाठी पहिल्या २२२२२ संस्थांना विशेष सवलतही देण्यात आली होती . तीन वर्ष पूर्ण होऊनही, सर्टिफिकेट मिळणाऱ्या संस्था हजारांपेक्षाही कमी आहेत 50% पेक्षाही कमी असं याचे चित्र दिसत आहे. आणि त्याचमुळे मार्चनंतर बऱ्याच संस्थांना मदत करण्यासाठी या मराठा चेंबर्स किंवा फिकी यासारखे संस्थांची तसेच डी आय सी यांच्या मदतीने ही योजना राबवण्यात येण्याची शक्यता आहे. या संस्थांची मदत ही प्रसारासाठी आणि तसंच एक्झिक्युशन किंवा इम्पलेमेंटेशन अथोरिटी म्हणूनही या संस्थांची मदत घेण्यात येत आहे. जे अपेक्षित होतं ते घडलं नाही , नक्की काय चुकलं याचा विचार करताना लक्षात आलं की बऱ्याच संस्थांना नोंद ठेवणे किंवा पुरावे ठेवणे अनावश्यक वाटते.नोंदी करण्यासाठी आवश्यक अशी माणसं त्यांच्याकडे नसतात. माहितीवर आधारित निर्णय यासाठी पुरावे आवश्यक असतात. नोंदी ठेवणे ही सवय आत्तापर्यंत नसते. किंबहुना मी मालक आहे आणि मला सगळं काही, आतलं बाहेर नक्की कळतं असा काही खोटा अहंकार, पद्धतीने काम करण्याच्या आड येत असतो. याला विरोध करायला गेलात , मालक म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही संस्थेतून काढून टाकू शकता . तुमच्या मदतीला आलेला सल्लागारही ते थांबू शकतात . त्याचे पैसे थांबून तुम्ही त्याच्याबरोबर काम बंद करू शकता. इतक्या दिवस तुमच्या अहंकाराच्या तुमच्या त्रुटी पैशाच्या बळावर तेव्हा अधिकारावर जोपासले जात होत्या . आता मात्र पुरावा दाखवा अन्यथा तुम्ही जागतिक दर्जाचे नाही हे मान्य करा, असा एक प्रश्न झेड तुमच्या पुढे मांडले आहे. सहाजिकच आपल्या कामाचा आपल्यावर होणार परिणाम म्हणजे कर्मचारी सहभागावर होणारा परिणाम, आर्थिक परिणाम, ग्राहकांवर होणारा परिणाम , पुरवठादारांवर होणारा परिणाम, सुरक्षिततेच्या दृष्टीने होणारा परिणाम, पर्यावरणावर होणारा परिणाम, नैसर्गिक साधन, ऊर्जा, तसेच इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी - बौद्धिक संपदा तीन वर्षाचे बॅलन्स शीट किंवा ताळेबंद, तीन वर्षाचे पुरावे किंवा प्रॉफिट ग्रोथ (Profit Growth)ची स्थिती या सगळ्याचा विचार झेड मध्ये केला जातो. इतक्या चाचण्यांमधून गेल्यावर तुम्हाला स्वतःचा अहंकार पुरवण्यासाठी वेळ मिळत नाही. आणि सहाजिकच स्वतःमध्ये त्रुटी, अहंकार, त्या खोट्या कल्पना लक्षात घेऊन सुधारण्याचे रस्ता मोकळा होतो. त्यासाठी तुमचे पिडीसीए (PDCA) - काय नियोजन होतं, काय प्रकारे काम केलं गेलं, तपासणी करून, काय दुरुस्ती करावी लागली याच्या नोंदी तुम्हाला ठेवणे आवश्यक असते. या सर्व पाहणीनंतर तुमच्या संस्थेत एक सकारात्मक बदल निश्चितच घडून येतो. यासाठी अनेक मध्यस्थ किंवा कन्सल्टन्सी आणि असेसर यांना ट्रेनिंग दिले जाते. त्यांच्या प्रतिक्रिया नुसार झेडच्या मॉडेलमध्ये ही बदल केले जातात.

संपूर्णपणे पुराव्यावर आधारित सर्टिफिकेशन ची ही प्रक्रिया असल्यामुळे ही तपासणी व्यक्ती निरपेक्ष असते. आणि स्वतःला कुठे सुधारणेला वाव आहे यासाठी तज्ञांनी तपासणी करून घेऊन तुमची संस्था योग्य त्या मार्गाने जागतिक पातळीवर सधी मिळावी म्हणून मदत दिली जाते. आता मुद्दा फक्त इतकाच आहे साधारण तुमच्या संस्थेचा खर्च कुठे कधी आणि का करायचा ठरवण्याचे नियोजन तुमच्या हातात असते, पण त्यासाठी आवश्यक जर मदत मिळत असेल, तर केव्हा माहिती नाही म्हणून न घेणं हा वेडेपणा ठरेल. आणि किंबहुना ही वेळ येऊ नये म्हणूनच ही व्याख्यानाला. यातुन कमितकमि प्रत्येक जण या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या संस्थेला आवश्यक ते मार्गदर्शन त्यांच्या लर्निंग पोर्टलवरून शिकून घेईल यात मला शंका वाटत नाही.

झेड मध्ये प्रत्येक सरकारी धोरणानुसार मागासवर्गीय , महिला उद्योजक, आणि जम्मू कश्मीर किंवा अंदमान येथील संस्थांना विशेष सवलत मिळते. आणि त्यामुळे या घटकांना प्रोत्साहन मिळते व त्यानिमित्ताने त्यांनी स्वतःच्या व्यवसायाकडे बारकाईने पहावे हे अपेक्षा आहे .

सेल्फ असेसमेंट मध्ये प्रत्येक प्रत्येक प्रश्नाला पाच पैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो .आणि तुम्ही निवडलेल्या पर्यायावर प्रमाणे तुम्हाला मार्क मिळत असतात. याचा अर्थ असा झाला की पुढे जाण्यासाठी जास्त मार्क मिळवण्यासाठी, तुम्ही काय करणे अपेक्षित आहे, हे तुम्हाला प्रश्न वाचत असतानाच कळते. थोडक्यात तुमच्या संस्थेमध्ये काय काय सुधारणा करता येतील , याची कुंडली तुमच्या समोर तयार होते. त्यामुळे तुमच्या स्वतः तपासणी किंवा self-assessment पासूनच तुमच्या संस्थेत चांगले बदल व्हायला सुरुवात होते . सल्लागाराच्या मदतीने किंवा अन्यथा स्वतःची स्वतः काही प्रशिक्षण घेऊन, तुम्ही जेव्हा झेड वाटचाल सुरु करता , तेव्हा आणि तुमच्या बरोबरीने , तुमचे कर्मचारी , तुमचे पुरवठादार आणि कस्टमर किंवा ग्राहक यांच्यात सुद्धा झेड - झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट (ZED) या बद्दल उत्सुकता निर्माण होते.

जे वेगवेगळे निकष लावले जातात त्यात - मेंटेनन्स, प्रोसेस कंट्रोल, ऑटोमेशन, टेक्नॉलॉजी, ट्रांसपोर्टेशन ,स्टोरेज, पर्यावरण, कर्मचारी बांधिलकी अशा घटकांचा विचार सक्तीच्या मुद्द्यांमध्ये केला जातो.

आणि सहाजिकच परस्परांवर अवलंबून होणारे सारेच उद्योग या मार्गांनी अधिकाधिक सफल ,अधिक चांगले होणे हे या मार्गातून अपेक्षा आहे.

अर्ज करताना तुम्ही काम करताना कायदेशीर कारवाई पुरी केली आहे, हे बघण तुम्हाला आवश्यक आहे . जर एखादा कायदेशीर मुद्दा पूर्ण नसेल, तर तुम्हाला कुठल्याही मानांकनाचा हक्क नाही. एवढेकष्ट करूनही यशाचे समाधान का मिळत नाही. अगदी साहजिक आहे, तुम्ही जेव्हा वर्ल्ड क्लास आहात असे म्हणता तेव्हा तुम्ही कायद्यानुसार वागत नसालं तर कस शक्य आहे? सहाजिकच तुम्हाला मानांकन नाही. अनेक संस्थांना कायद्यानुसार पूर्ती करण्यात खूप अडचणी असतात आणि त्यांना वाटतं कष्ट घेतला तरीही आम्हाला यश मिळालं नाही. कायद्याचे पालन तुमच्यासाठी आणि समाजासाठी अत्यंत आवश्यक असा भाग आहे. अशा लोकांना त्यापेक्षा अधिक पुढे जाण्याची इच्छा असेल आणि त्यासाठी त्यांना मदत करायला अनेेक आहेत. त्यांनी दिलेले पुरावे आणि त्यांनी दिलेला मानांकन, यामधील तज्ञांची तपासणी पडताळून बघता, यामध्ये जर काही प्रश्न आले , तर त्याचे उत्तर संस्थांना तसेच असेसर ना द्यावे लागते. त्यानंतर केवळ योग्य असेल ते मूल्यांकन तुम्हाला मिळते. पुराव्यांवर आधारित या साऱ्या तपासणीवर आणि पुन्हा पडताळणी वर योग्य असे गुण तुम्हाला मिळाल्याने , तुम्हाला ब्रांझ, सिल्वर, गोल्ड किंवा प्लॅटिनम, डायमंड कुठलेही मानांकन किंवा सर्टिफिकेट दिलं गेलं, तरी सगळ्या तज्ञांच्या मदतीने तुम्ही त्या पातळीवर पोहोचला आहात याची खात्री तुम्हाला दिले असते . आणि याच्या पुढे काय करायचं कशी सुधारणा करायची याचा एक मार्गदर्शक नकाशा तुमच्या हाती येतो. पुढच्या पातळीवर जाण्यासाठी सल्लागारांची मदत घेणे शक्य आहे. पण तुमच्या टीम मधून याच्यावर काम करणे त्याहून शक्य आहे. सहा महिने पुन्हा अर्ज किंवा असेसमेंट तुम्हाला करता येत नाही. पण सहा महिन्यांनी तुमची पुढची पातळी तुम्ही गाठली आहे, अशीही तुम्हाला खात्री असेल, तर त्यासाठी पुन्हा अर्ज आणि तपासणी , तुम्ही परत करून घेऊ शकता. शक्यतो दिलेेले मानांकन 4 वर्षासाठी ग्राह्य असतं. आणि त्यात तुम्ही अर्ज केला नाही, तरीही दोन वर्षांनी परत एकदा या परीक्षेला तुम्हाला तोंड द्यावे लागते.

यात मिळणारे फायदे अनेक आहेत. वेगवेगळ्या प्रदर्शनात तुम्हाला निशुल्क प्रवेश मिळू शकतो. बँकांच्या कर्जाचा व्याजदर - इंटरेस्ट रेट कमी असतो. काही राज्यात आर्थिक मदतही मिळत आहे. अधिक व नवीनतम माहितीसाठी झेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

माझ्या मते बाहेरून मिळणाऱ्या मदतीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या संस्थांतर्गत निर्माण होणारी सकारात्मक दिशा महत्वाची. तुमच्या संस्थेत एक जिद्द , स्वतःला सिद्ध करण्याची ओढ आणि थोडंही नुकसान किंवा पर्यावरणावर अपायकारक परिणाम होऊ देणे , पटत नाही अशी संस्कृती तयार होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बचत होऊन , तुम्ही आपले पैसे वाचू शकता. सरकारच्या वेबसाइटवर तुमचं नाव आल्यामुळे, अनेक विदेशी गुंतवणूकदार तुमच्याकडे एक योग्य गुंतवणूक म्हणून बघायला लागतात.

अतिशय नाममात्र शुल्कामध्ये तुम्हाला अनेक देशी-विदेशी संधी उपलब्ध करून देणारे, आत्मनिर्भर भारत बनवणारी, झेड योजना आहे . तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सध्याच्या परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन आपण जास्तीत जास्त देशांतर्गत, आणि देशाबाहेरील संधीचा फायदा मिळून घेऊ, अशी आम्हाला आशा आहे.यातुन सक्षमीकरण - कपॅसिटी बिल्डींग होईलच

सगळ्या तपासणीमध्ये गेल्या तीन वर्षांची माहिती आणि विश्लेषण आवश्यक असते . त्यामुळे सहाजिकच कमीत कमी 3 वर्ष पूर्ण केलेली कुठलीही उत्पादक संस्था यामध्ये सहभागी होऊ शकते . त्यामुळे तुम्ही भारतीय आहात तीन वर्षे उत्पादन काम करत आहात, या गोष्टीत बसणाऱ्या प्रत्येक संस्थेने पर्यावरण-अपाय तसेच होणाऱ्या चुका,टाळून बौद्धिक संपदा संरक्षण, ट्रेडमार्क, सुरक्षा ,कर्मचारी बांधिलकी यासारख्या विषयांचा , आपल्या उत्पादनच्या बरोबरीने विचार करावा , याची अपेक्षा झिरो डिफेक्ट आणि झिरो इफेक्ट मध्ये आहे.

या प्रणालीत एकूण 50 घटक असून, त्यातले बौद्धिक संपदा (Intellectual Property), ट्रेडमार्क (Trademark) हे विषय सक्तीचे नसून ,तुम्हाला आपण याचे पुरावे देऊ शकू किंवा याच्यावर आपण काम करू शकतो किंवा करत आहोत असं वाटलं , तरच हे पर्याय तुम्ही तर निवडू शकता, पण वीस पर्याय मात्र सक्तीचे असून त्यात निवडीचा काही पर्याय- चॉइस नाही. 20 मँडेटरी पर्याय निवडण्यापूर्वी आपल्याला जिथे योग्य निवडीची संधी आहे असे दहा पर्याय निवडणे आवश्यक ठरतात. मेंडेटरी किंवा सक्तीच्या पर्यायांमध्ये उत्पादन नियंत्रण, फाईव्ह एस, असून त्यामध्ये प्रोडक्शन, पर्यावरण ,ऊर्जा ,सुरक्षितता आणि नफा याचे कारक म्हणजे एनेबलर आणि परिणाम म्हणजे रिझल्ट याचा विचार केला आहे. तीन वर्षाचा आढावा घेऊन त्यावर हा परिणाम ठरवला असल्यामुळे, संपूर्णपणे माहीतीवर आधारीत निर्णय घेतला जाईल . असेसर बदलला म्हणून निर्णय बदलले जात नाही. एखाद्या वर्षी यावर बाहेरच्या कुठल्याही घटकाचा किंवा अंतर्गत कुठल्याही घटकाचा तात्पुरता परिणाम जसं स्पर्धेचा , कायदा बदलण्याचा, तुमच्यावर तात्पुरता काहीसा फरक पडू शकतो. त्याचा विचार व्यवसायासाठी आवश्यक आहे, पण तीन वर्षांमध्ये सातत्याचा चित्र दिसत असल्यामुळे, तात्पुरत्या बदलण्यापेक्षा तुमच्या संस्थेची दिशा, या परिणामांमध्ये स्पष्ट होते. सातत्याने तीन वर्षे तुमचे परिणाम मिळत असतील, तर त्या मागे तुमच्या संस्थेचे कष्ट आहेत, तसेच सिद्ध झालेली कुवत आहे हे लक्षात घेऊन , तीन वर्षातले ट्रेंड म्हणजेच निर्देशक, पाहूनच तुमची पातळी ठरवली जाते. ऊर्जा बचत, ऊर्जा मोजणार्‍या मीटरची स्थिती- इलेक्ट्रिक मीटर पळ नोंदी या परिणामा बरोबरच सुधारणा प्रकल्प ही तपासणी करून ठरवले जातात.अशी सर्व संभाव्य धोक्यांची काळजी घेऊन आणि तपासणी करून झालेला परिणाम योग्य आहे ना हे तपासून, योग्य ती यंत्रणा म्हणजे सॉफ्टवेअरचा वापर आणि विचार या तपासणीत केला असतो . योग्य ध्येय, योग्य कारवाई, आलेल्या त्रासांचे योग्य विश्लेषण , योग्य बदल , सुधारणा यातून सिद्ध झालेले निर्देशक म्हणजे ट्रेड (Trend) तपासूनच तुम्हाला त्या प्रश्नाला योग्य ते मार्क- गुण दिलेले असतात . त्यामुळे काहीतरी दाखवून ऑडिटला बनवता येईल, किंवा असेसर च्या कडून मार्क मिळवता येतील, असं होत नाही. बऱ्याच वेळा इतर सर्टिफिकेट मध्ये तुमच्यासाठी कागदपत्रांची पूर्तता, नोंदी सल्लागार तयार करून देतो . तसे कुठलेही कागद तयार करायला झेड मध्ये कुठलाही वाव नाही. त्यामुळे झेड असेसमेंट किंवा इम्पलेमेंटेशन हे कागदोपत्री न राहता, तुमच्या संस्थेच्या सर्व बल स्थानांचा आणि सर्व संधींचा विचार करूनच येऊ घातलेल्या धोक्यांचा किंवा जोखीम किंवा थ्रेट अर्थात एस डब्ल्यू ओ टी (SWOT) म्हणजेच स्वॉट बलस्थान स्ट्रेंथ कमजोरी म्हणजे विकनेस आणि संधी-ऑपॉरच्यूनिटी आणि थ्रेट किंवा जोखीम याचा सर्वांकश विचार तुमच्यासमोर व्यक्तिनिरपेक्ष रीतीने केला जातो. आणि या साऱ्यातून जेव्हा तुम्ही तावून-सुलाखून पूर्ण होता. किंवा सर्टिफिकेट मिळता, तेव्हा साहजिकच गव्हर्मेंट ऑफ इंडिया च्या वेबसाईटवर तुमच्या संस्थेचे नाव आणि तुम्ही मिळवलेली पातळी लिहिले असते . आम्ही महान आहोत असे म्हणण्यापेक्षा आमच्या विभागातल्या आमच्या देशातल्या या अत्यंत चांगल्या संस्था आहेत. असे सरकारने सांगणे हे केव्हाही चांगलं. तेव्हा ही मान्यता किंवा हे रेकग्निशन किंवा हे मानांकन मिळवले म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात इतरांपेक्षा जास्त चांगले स्थान मिळते .वेगवेगळ्या प्रदेशाना प्रॉडक्टस एक्सपोर्ट - उत्पादन निर्यात होते.

झेडचे रजिस्ट्रेशन पासून सर्टिफिकेशन पर्यंत सर्व कामकाज हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर चालत असल्याने, कुठलेही कागदपत्र किंवा लिखापढी यासाठी लागणारा वेळ वाया जात नाही. तुमचं ऑनलाईन रजिस्टर करताच क्षणी तुम्हाला एक नंबर दिला जातो. आणि हा नंबर तुमच्या सर्टिफिकेटवर सुद्धा येतो . प्रत्येक पुराव्या नंतर तुम्हाला त्याचे निश्चित केलेल्या मार्क तुम्हाला कळत असतात. थोडक्यात ही सगळी प्रक्रिया, ही साईट असेसमेंट पर्यंत अतिशय कमी वेळेत होते. साईट असेसमेंट नंतर कमिटी आणि सर्टिफिकेशन रिव्ह्यू किंवा आढाव्यामुळे मानांकनास वेळ लागू शकतो. कारण त्यात आवश्यकता असल्यास चर्चा आणि पुनर्तपासणीसाठी वेळ अपेक्षित आहे. पण खूप मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन किंवा सॉफ्टवेअरचा वापर केल्यामुळे तुम्हालाही आपल्या नोंदी डिजिटलाइज्ड किंवा संगणकाचे वापर करून करायला खूप सोपे जाते . संस्थेच्या प्रक्रियांचे निकष, पद्धती ,नियोजन , त्यांच्या नोंदी सगळ्याकडे डिजिटल असू शकतात आणि तुम्ही कागदोपत्री केलं तरी असलं तरी ह्या असेसमेंट पद्धत बघताना, आपण कागद, वेळ वाया घालवतो आहोत आणि हे इतके सोपे पर्याय उपलब्ध आहेत, हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे वाया जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं प्रबोधन होऊन , शक्य तितक्या लवकर शक्य तितके योग्य आणि शक्य तितके चांगल्या क्वालिटीचं, कमीतकमी पर्यावरणावर अपायकारक परिणाम करणारे, तुमचं काम सुधारण्याला, झेडची मदत होते . झेड मिळवणाऱ्या प्रत्येक संस्थेने फार मोठे फायदे मिळवले आहेत. अंतर्गत शिस्त असो किंवा बाहेरच्या मार्केटमध्ये प्रवेश असो, नवीन कॉलाबोरेशन्स वा मार्केटिंग मध्ये मिळणारा फायदा असो, कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांना निश्चितच परतावा मिळाला आहे. आणि त्याच मुळे कोणी असं म्हणत नाहीय मी उगीचच एवढा खटाटोप केला. त्यामुळे कष्ट करायला काय हरकत आहे झाला तर फायदाच होईल, किंवा तोटे नक्कीच नाहीत. हे लक्षात घेऊन सर्टिफिकेट म्हणजे वॉल हेगिंग किंवा कागदोपत्री तडजोड हा विचार विसरुन जातो. योग्य कारक आणि पूरक आणि योग्य तो रिझल्ट त्याच्या पार्श्वभूमीवर आपले यश खणखणीत वाजवून आंतरराष्ट्रीय स्थान मिळवण्यासाठी झेड च्या वाटेने आपण वाटचाल सुरू करणं खूप आवश्यक आहे.

आजच सुरु करूयात BCMS

लहानपणापासून भा.रा. भागवतांच्या फास्टर फेणेचे पराक्रम वाचताना आपणही असे सायकलवरून इकडेतिकडे जाऊन मित्रांच्या बरोबर काही अकल्पित करून हिरो बनावे अशा कितीतरी गोष्टी मनात येत.

संकटाला तोंड देण्याची खुमखुमी काळात विरुन गेली. इकडेतिकडे जाणारा फास्टर फेणे काही संकटांच्या मागे पळायचा नाही, तर त्यांच्या मागे संकट पळायची असं बहारदार वर्णन त्याबद्दल होतं.

आज संकटाला तोंड देण्याची तयारी नसेल तर त्यापासून दूर पळायची तरी कुवत ही आपण हरवून बसलो आहोत. सगळ्या संकटातून मार्ग काढण्याची अफलातून कुवत आणि जिद्द याची स्वप्ने लहानपणापासून वेडेपणा ठरविल्याने रुळलेली वाट न सोडता आम्ही मोठे झालो.

पण अचानक करोना, मंदी अशी संकटे आली आणि लहानपणापासून बाळगून राहिलेली तरीही अडगळीत पडलेली ती स्वप्ने आठवली. त्याचमुळे फास्टर फेणेप्रमाणे काही तरी करायची जिद्द जागी झाली.

या गोष्टी ऐकत आणि वाचत आम्ही मोठे झालो. तोच सगळ्यांचा लहानपणीचा आदर्श होता. तसाच काहीसा आदर्श आज व्यवसायात आपत्तीतून मार्ग करणाऱ्या प्रत्येक कारखानदारांना जर मिळाला, तर आपण करोना काय यापेक्षा अजून कुठलीही संकट आले तरी त्याला तोंड द्यायला तयार असू.

आपल्यापेक्षा समाजाची काळजी करणारा फास्टर फेणे आमच्या बिझनेस कंटिन्युटी मॅनेजमेंट सिस्टीमचा पहिला धडा होता.

फास्टर फेणेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला जितके शत्रू होते, तितकेच खूप चांगले मित्र होते. त्याच्या प्रत्येक संकटातून त्याच्या मित्रांनी त्याला चांगली साथ दिली. असे स्ट्रॉंगअसोसिएटस् - तुमचे सहकारी मदतनीस, जर तुम्ही निर्माण करू शकला, तर कदाचित आदर्श व्यक्ती होण्याचं, हिरो होण्याची, समाजात घरात कामात सातत्य राखणे नक्कीच तुम्हाला शक्य होईल.

तुमच्या कारखान्यात काय काय संकट येऊ शकतात याचा विचार तुमच्या करता आणि त्यातल्या कुठल्या गोष्टी तुमच्या अत्यंत क्रिटिकल आहेत? त्याशिवाय तुम्ही तुमचं व्यवहार पूर्ण करू शकणार नाही. याचा विचार करून जर तुम्ही तयार राहिलात, तर कुठल्याही संकटाला तोंड देण्याची तुमची कुवत ही वाढत जाईल. . प्रत्येक उद्योजकात संकटाला तोंड देण्याची कुवत असली पाहिजे . त्यातूनच प्रगतीचा मार्ग मोकळा होत असतो .

आरटीओ (RTO) समजून घेण्यासाठी - सर्वपरिचित उदाहरण विचारत घेऊ यात - पिझ्झाच. '३० मिनिटात पिझ्झा अन्यथा पिझ्झा मोफत/फ्री' या ऑफरच्या मागचा विचार हाच की जर वेळेत खाणं मिळाले नाही, तर काय उपयोग, कोणताही भुकेला ग्राहक त्याला पर्याय शोधला जाईल, ३० मिनिटांनंतर गार पिझ्झाची फारशी गरज नाही. असा उशिर हा केवळ पुढची ऑर्डर मिळवण्यासाठी नव्हे तर ब्रँड वा नावाला घातक आहे. थोडक्यात ३० मिनिटे हा या उदाहरणतील MAO - (Maximum Allowable Outage) किंवा सहनशीलतेचा अंत ठरतो, त्याच्या आत माझा पिझ्झा पोचला नाही तर पर्याय न शोधता सहनशीलता वाढवण्यासाठी दिलेली लालूच आहे. ऑर्डर कॅन्सल झाली तर हा पिझ्झा वा आदी सारे वेळ नी पैसा वाया जात आहे, तर वेळेचे स्वतःवर घातलेले बंधन आरटीओ (RTO) MAOवरून ठरवावे. साहजिकच ठरवलेले RTO हा आवश्यक/गरजेच्या MAO पेक्षा कायम कमीच असावा. यामुळे ग्राहकांना समाधान, सातत्य ब्रँड इमेज साधता येते त्याच बरोबर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची कुवत असली पाहिजे. जसे वाहनं, फ्राच्यायसिज या तरी गुंतवणूक करावी लागते.

ही कुवत म्हणजे रेझिलियंस (Resilience) - प्रतिकारशक्ती. त्याची हिंमत किंवा तग धरून राहाण्याचे कौशल्य - रिस्क अपेटाइट (RIsk Appetite), पर्याय - रिडंडनसि (Redundancy), शिस्त - प्रिपेअडनेस ड्रिल (Preparedness drills), संसाधनांचा वापर - रिसोर्स , संवाद - कम्युनिकेशनस् या साऱ्या बाबी कादंबरीत शिकून घेतले, तरीही त्याचे महत्त्व आज समजले.

जास्त नफा, व्यवसाय भरभराटीला येणार या पलिकडे सामाजिक जाणीव बिझनेस कंटिन्युटीसाठी आवश्यक आहे.

जर पैसा वा तंत्रज्ञान नसेल तर कल्पक माणसं हवीत.फक्त आपल्या कारखान्यात योग्य ते उपाय योजना सगळे करतात,पण परस्परावलंबीत आणि परस्परांना पूरक समाज कुठलं ही संकटाला तोंड देऊ शकतो. माणसे धरून राहाण्याचे विचार घराला पुढे नेण्यासाठी आवश्यक आहेत.

एकट राहाण्याचे विचार केवळ सूर्य तेज करु शकते. बाकी सारे नाही. आघात सहन करत केवळ एकटे पुढे जाऊ शकणार नाही. बाधित माणसं बरी झाल्यावरच आपल्या जीवाची काळजी कमी होते.

संगे, सवंगडी , घरगुती , सोयरे याचा अर्थ आधार. अडिअडचणीत साथ मिळण्यासाठी याचा विचार केला जातो. हे परस्परावलंबन आपल्या संस्कृतीला नवीन नाही.

पण दुष्काळ, महामारी या संकटाला तोंड देण्याची तयारी करायची आवश्यकता म्हणून बचत आणि दुसऱ्याचा विचार करण्याची कला शिकून घेतली पाहिजे.

बिझनेस जर नवनवे प्रयोग, तंत्रज्ञानाचा वापर, व्यक्तीविकास, पर्याय न शोधता चालू राहील तर त्याची लवचिकता कमीकमी होत एकाही संकटाला तोंड देण्याची तयारी न उतरता तो कोसळेल.

अपरिहार्यपणे आय टी (IT)चा वापर करावा लागतो तेव्हा सायबर क्राईमचे वाढते प्रमाणही लक्षात घेऊन सिक्युरिटी आणि बिझनेस कंटिन्युटीचा विचार करण्याची सर्वांना आवश्यकता आहे.

बिझनेस कंटिन्युटी मधे कस्टमर, सप्लायरचेन, कामगार, सरकारी अधिकारी यांचा विचार करून प्रत्येकाला अपेक्षित गरजा पूर्ण करण्यासाठी योजलेल्या उपाययोजनांचे नियोजनही आवश्यक आहे.

आय टी(IT), मशिन, इंन्फ्रास्ट्रक्चर - पायाभूत सुविधा, माणसे यांना अडचणी आल्या तरी आपल्या व्यवसायाचे भरून न येणारे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

आणि त्यामुळे ग्राहकांची, सर्व संबंधितांची बिझनेस कंटिन्युटी ने काळजी घेतली जाते.

चला तर मग, निदान पंतप्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे सारे बिझनेस कंटिन्युटी चार विचार करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करू या.

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.

वाॅश - कोविद सेन्स्

कॉमन सेन्स् म्हणजे व्यवहारज्ञान आणि कोविद म्हणजे तज्ञ. तज्ञाकडे असलेले ज्ञान बऱ्याच वेळा पढतमूर्ख ही पदवी मिळून कुचकामी ठरू शकते. अनेक प्रश्नांवर उपजत व्यवहारज्ञानचा वापर करून सोपी उत्तरं शोधता येतात. पण करोना सारख्या समस्येवर फक्त व्यवहार ज्ञान पुरेसं नसतं, त्यात तज्ञांचे ज्ञान आवश्यक ठरत. या समस्येवर उपाय तज्ञ योजू शकतात. पण जेव्हा अहंकार आड येतो किंवा त्यात काय नवीन सांगत आहेत असं दुर्लक्ष करण्याचा स्वभाव आड येतो तेव्हा खरी समस्या येते. तेव्हा अंगभूत व्यवहार ज्ञानापेक्षा तज्ञांच्या ज्ञानाचा आधार घेणे महत्त्वपूर्ण ठरते. आणि तज्ञांनी एकत्र येऊन एक मार्गदर्शक मालिका तयार केली आहे वॉश हे त्याचं नाव त्याची ओळख करून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.

सर्वात आधी MCCIA ने या विषयावर व्याख्यान आयोजित केले. वाॅश आणि बिझनेस कंटिन्युटी या विषयावर आता बाकी प्रशिक्षण सुरू झाले आहेत.

पण प्रथम येण्याचा मान MCCI ने आम्हाला दिला आता त्यांच्या मदतीने या लेखातून तुमच्या समोर येण्याचा मार्ग मोकळे झाले.

करोनाच्या लाॅकडाउनचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी गुणवत्ता उत्कृष्टतेची वाटचाल अर्थात ‘जर्नी ऑफ कवाॅलिटी एक्सलन्स्’ - हा वेबिनार मराठा चेंबरनी आयोजित केलेला.या वाटचालीत अनेक नवीन संबंध आणि संधी मिळाल्याने आमच्या आनंदाला उत्साहाची जोड मिळाली. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून झालेली चर्चा खुप आवडल्याचे फीडबॅक, प्रश्न उत्तरे अश्या माध्यमातून भारावले दिवस आणि रात्री भराभर सरल्या.

त्यामुळे मराठा चेंबर बरोबर वेबिनार करायची आता उत्सुकता वाटते. ‘जर्नी टू एक्सेलंस’ अर्थात ‘उत्कृष्टतेकडे वाटचाल’ या पाच दिवसाच्या वेबिनारमध्ये पाच महत्त्वपूर्ण संस्थेच्या प्रगतीचे पैलू सूचित केले .

पहिला दिवशी वेगवेगळे सर्टिफिकेशन - प्रमाणीकरण (Standardization) आणि त्याचा उत्कृष्टतेचा असलेला दुवा. दुसऱ्या दिवशी सिक्स सिग्मा (Six Sigma)अर्थात दोषरहित उत्पादन. या तंत्रांचा विचार केला. तिसऱ्या दिवशी लोकांचा सहभाग सांगणाऱ्या क्वॉलिटी सर्कल (Quality Circle) यातून माणसांची मन, विचार, आणि हात संस्थेच्या उत्कर्षाकडे कसे लावावेत याची चर्चा केली. तिसऱ्या दिवशी कायझेन (Kaizen) म्हणजे नाविन्यपूर्ण सृजनशीलतेला वाव देणारे वेगवेगळी तंत्र आपण शिकून घेतले. जपान मध्ये कायझेनचा (Kaizen*) शोध लागला आणि मानवी आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळाली. काय (Kai) म्हणजे बदल आणि (Zen) झेन म्हणजे शहाणपणा वा सुधारणा. *(Change + Wisdom = Betterment). आयुष्याला आकार देणाऱ्या या जादूसम तंत्राचा उपयोग करून आपण आपले जगणे आणखी सोपे आणि सहज करू शकतो.

आणि शेवटच्या दिवशी - महत्त्वपूर्ण पण वाया जाणाऱ्या घटकांशी युद्ध करून आपल्या नफ्यामध्ये वाढ कशी करावी, याची थ्री एम (3M) म्हणजे मकरानी सुरू होणाऱ्या जपानी तंत्रांची ओळख करून घेतली. यातील मकारांमध्ये मुडा, मुरा आणि मुरी याचा उल्लेख येतो. अनेक उदाहरणांमधून केलेला हा सेमिनार सर्वांना खूप आवडला. चेंबरच्या तज्ञ मंडळींनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आणि शेवटच्या समारोपाच्या दिवशी दीपक करंदीकर सरांनी प्रोत्साहनात्मक शब्द सांगून आमचा उत्साह वाढवला. यानंतर काहीतरी महत्त्वपूर्ण म्हणजे झेडचे या माध्यमातून प्रशिक्षण करावं असा एक विचार आला. आणि झेड सेन्सटायजेशन - झेडची तोंड ओळख - यासाठी चार दिवसाचा वेबिनार आयोजित करण्यात आला.

मराठा चेंबरतर्फे जेव्हा झेडचे ट्रेनिंग आहे हे माझ्या ओळखीच्या लोकांना कळवलं असता पहिली प्रतिक्रिया आली - “कशाला? सध्या तर झेड रजिस्ट्रेशन, झेड तपासणी बंद आहे ना ?” - हो, झेडची कारवाई सध्या बंद आहे . म्हणजे सध्या रजिस्ट्रेशन थांबले आहे. सर्टिफिकेशन थांबले आहे. आणि त्याचे मुख्य कारण करोना हे असले, तरीही त्यावर मात करण्यासाठी आवश्यक ती तपासणी प्रक्रिया वॉश (WASH) आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी तयारी कशी काय करतात? याची माहिती सहाजिकच सर्वांना विशेषतः कंपनीच्या मालकांना आणि कंपन्यांनासुद्धा आवश्यक आहे.

कार्यस्थळातील सुरक्षितता आणि शुचिता किंवा वॉश (WASH) या इंग्रजी आद्याक्षरांनी बनलेल्या शब्दात म्हणजे वर्कप्लेस असेसमेंट फॉर सेफ्टी आणि हायजिन (Workplace Assessment for Safety and Hygiene) या स्टॅंडर्डच्या 15 घटकांच्या मदतीने काय करावं याची माहिती, सांगितली आहे.

संपर्कामुळे होणारा करोनाचा प्रसार मर्यादित राहण्यासाठी करायच्या प्रतिबंधात्मक योजनांची माहिती या स्टॅंडर्डमध्ये दिली आहे . तपासणीसाठी आवश्यक अशी तपासणी सूची आणि वापरल्या जाणाऱ्या ऑडिट रिपोर्टची सर्व माहिती, वापरल्या जाणाऱ्या व्यक्तिगत सुरक्षा साधने म्हणजे पर्सनल प्रोटेकक्टीव ईकविपमेंट - पी. पी. ई. (PPE) - यांच्या वापराची, तसेच विल्हेवाटीची म्हणजेच डिस्पोजलची माहिती या स्टँडर्ड मध्ये दिली आहे .आपल्या कामामुळे किंवा कामाच्या संदर्भात येणारे व्यक्तीमुळे किंवा त्यांच्या गैरवर्तनामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून करायच्या प्रतिबंधक योजनांची यादी या स्टँडर्डमध्ये दिली आहे.

झेडप्रमाणे, आधी तुम्ही स्वतः त्याची तपासणी करून घेणे अपेक्षित आहे. आणि सगळी माहिती अगदी चेकलीस्ट (Checklist) सुध्दा नि:शुल्क किंवा फ्री या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ती समजून घेऊन, त्याप्रमाणे आपण काम करतो आहे, याची स्वतः पडताळणी करून झाल्यावर, आवश्यकता वाटल्यास इतरांना कळावं म्हणून सर्टिफिकेशन एजन्सीकडून किंवा थर्ड पार्टी कडून तपासणी करून घेणे, आवश्यक वाटल्यास करता येते. पण तुमच्या किंवा तुमच्या व्यवसायासंबंधी जे लोक आहेत, त्यांनी तुमच्या अत्यावश्यक सूचनांचे पालन करावे यासाठी आग्रह मात्र नक्की करा. सेल्फ सर्टिफिकेशन तरी करावे हा आग्रह धरा. कारण तुम्ही त्यांच्यावर अवलंबून असता. आणि हे परावलंबित्व तुम्हाला संसर्ग किंवा रोग देऊ शकते. तुम्हाला पण स्वतःची तसेच स्वतःच्या व्यवसायाशी काळजी - तो बंद तर होत नाही ना, ही काळजी घेतली पाहिजे.

वाॅश फक्त दहा हजार पाचशे मध्ये तपासून मिळणार आहे. आणि त्या रिपोर्टमध्ये सर्टिफिकेट असणार आहे.

"हा तर कॉमन सेन्स् आहे याचं प्रशिक्षण कशाला?" अशी चलाख उत्तरही व्यवहारचतुर लोकांनी दिली. आणि त्यावर फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं - दहा हजार पाचशे मध्ये तुमच्या संस्थेचं व्यवहारचातुर्य किंवा व्यवहार ज्ञान असेस होत असेल काय हरकत आहे? करून टाका. तयारी करावीच लागणार नाही. राहता राहिलेला फक्त एक अधिकृत शिक्का घेण्याचं काम, करून टाका.

व्यवसायात सातत्य अर्थात व्यवसाय बंद होत नाहीये ना? याची काळजी तुम्ही बिझनेस कंटिन्युटी मॅनेजमेंट सिस्टम अर्थात ISO 22301 या माध्यमाच्या सहाय्याने तुम्ही घेऊ शकता. पण किमान तुम्ही स्वतःची आणि त्याच प्रमाणे पुरवठादार आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी काय काळजी घ्यावी ? कोणत्या कमीतकमी सूचनांचे पालन करावे ?, कुठले पी. पी. इ. (PPE) वापरायचे? यासाठी या माध्यमातून सगळी झेड टीम मदतीला पुढे आली आहे.

या कार्यक्रमात वॉश आणि बिझनेस कंटिन्युटी याचा समावेश करण्याचे हे महत्त्वाचे कारण व्यवसाय सातत्य आणि सर्वांची सुरक्षितता हा आता महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे , आणि त्यामुळे त्यांची तोंड ओळख आपण या कार्यक्रमात करून घेतली.

कार्यक्रमामधून आपले कर्मचारी आपला व्यवसाय आणि संबंधीत विषय सुरक्षित राहून, आपल्या व्यवसायात सातत्य, सुरक्षितता यावर आणि त्यातूनच उत्कृष्टता किंवा जागतिक दर्जा प्राप्त करावा हा उद्देश होता.

शीर सलामत तो पगडी पचास - व्यवसाय चालू राहिला तर त्याला मिळालेली सर्टिफिकेट आणि उत्कृष्टतेची वाटचाल चालू राहील. अन्यथा या सगळ्याला काहीच अर्थ उरणार नाही. आणि त्यामुळे ज्या कंपन्यांनी झेड केला आहे त्यांनी आणि ज्या करू इच्छितात, त्यांनी सर्वात अधिक हा विचार समजून घेणे आवश्यक होते.

यासाठी आहेत ते सुरक्षिततेचे प्रतिबंधक उपाय तसेच पर्याय समजून घेण्यासाठी मदत झाली. त्यामुळे झेड करायचं नसेल तरीही तुमच्या व्यवसायाचं सातत्य किंवा सुरक्षिततेच्या कडे कानाडोळा न करता किंवा संसर्गामुळे दुबळी न राहता या करोना संकटाला तोंड देण्याची तुमची व्यावसायिक कुवत किती आहे, हे तपासण्यासाठी तुम्हाला वॉश या मानकाची तसेच बीसीएमएस म्हणजेच बिझनेस कंटिन्युटी या मानकाची खूप मदत होते हे समजून दिले.

झेडमध्ये अनेक स्टॅंडर्ड समाविष्ट आहेत. तसेच लीन ही कार्यपद्धती पण अपेक्षित आहे. इंटलेक्चुअल प्रॉपर्टीचाही त्यात उल्लेख येतो. थोडक्यात झेड हे सर्वांकष निर्देशन आहे .

झेड सर्टिफिकेशनची तयारी करायची का? त्याची अंमलबजावणी करायचे का? त्या वाटेने जायचं का? नाही? हे ज्याचे त्याचे प्रश्न आहेत. परंतू या माध्यमाबद्दल जर पुरेशी माहिती नसेल, तर व्यवसायाच्या येऊ घातलेले धोके किंवा संधी याची जाणीव नसल्यामुळे, त्यावरील उपाय योजनांची वा त्या संबंधित माहिती नसेल, तर तुमच्या व्यवसायाला निश्चित धोका संभवतो.

क्वॉलिटी/गुणवत्तेसाठी ISO 9001, पर्यावरणासाठी ISO 14001, सुरक्षिततेसाठी ISO 45001, ऊर्जा बचतीसाठी ISO 50001, इन्फॉर्मेशन सुरक्षिततेसाठी ISO 27001, व्यवसायाच्या सातत्यासाठी ISO 22301 या सर्व सर्टिफिकेटवर होणारा खर्च बघता, झेड अतिशय साधं, सोप्पं, आणि सहज वाटायला लागते.

ज्यांनी झेड मिळवलं आहे, त्यांनी त्याचा योग्य वापर केलाय की नाही? हे तपासून बघण्यासाठी किंवा ज्यांनी झेड केलंच नाही त्यांनी झेड का करावं यासाठी, या व्याख्यानमालेचे उपयोग झाला. थोडक्यात झेड आणि झेडनंतर काय? झेड कशासाठी? या दोन्ही मुद्यांचा व्याख्यांनां मध्ये विचार करण्यात आला आणि त्याचबरोबर बिझनेस कंटिन्युटी - व्यवसाय सातत्य यासाठी महत्त्वाचे मुद्दे आणि त्यासाठी वापरली जाणारी तंत्र थोडक्यात सांगितली गेली. या चार दिवसात निदान त्याची तोंड ओळख सगळ्यांना झाली.

तसेच वॉश म्हणजे कार्य स्थळाची सुरक्षितता आणि शुचीता याचीही आपण ओळख करून घेणाली. थोडक्यात आजच्या काळाला, आजच्या संकटाला अनुसरून, आपल्याकडे किती डाटा (Data) असावा ? तो डाटा कश्यासाठी वापरावा? आपण कोणाकोणावर अवलंबून आहोत? आणि सातत्यासाठी कुठली प्रक्रिया, व्यक्ती, उपकरणं, ग्राहक, पुरवठादार, माहिती यासारख्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, याचा विचार प्रत्येकाने केला असेल. पण तो एका सुसूत्रतेने करून आपल्या व्यवसायात प्रत्येक गोष्टींचा स्थान काय आहे हे तथा ही संकल्पना समजून घेणे आपल्याला खूप मदतीचे ठरणार आहे. या परिणामांची जाणीव यामुळे झाली.

त्यामुळे आता या क्षणी झेड किंवा कुठल्याही सर्टिफिकेशन किंवा रजिस्ट्रेशन करणे, किंवा त्याचे सर्टिफिकेशन मिळवणे शक्य नसलं तरी ही महत्त्वाची माहिती शिकून, आपल्या व्यवसायात सातत्याने सुधारणा, आणि त्वरेने किंवा अत्यंत गतीने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी करायची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन या व्याख्यानमालेत मिळाली. झेड बंद असल्यामुळे ज्यांचे काम सध्या थांबले आहे, त्या पार्श्वभूमीवर काय करायचं ? कसं करायचं? या प्रश्नांवर विचार करण्यात आला.

सध्या सगळी झेडची टीम वाॅश (WASH) वर काम करते आहे. आणि करोनासारख्या कुटिराघात - बिझनेसवर झालेल्या आघातामुळे व्यवसाय सातत्य मार्गदर्शन सगळ्यांना समयोचित ठरेल असं वाटलं होतं.

झेड मध्ये कार्यक्षेत्राची सुरक्षितता येत असल्याने झेडचा विचार वाॅशनी सुरु करावा म्हणून पहिल्या दिवशी वर्कप्लेस असेसमेंट (Work Place Assesment) हा विषय घेतला. खरं तर सगळ्यात संस्था चालकांना असं वाटतं - यात नवीन ते काय ? हा तर कॉमन सेन्स्. आमच्याकडे सगळेच लोकं सुरक्षितता आणि शुचिता याचा वापर करतातच...

खरं तर सगळेच अभ्यास करत असतात आणि तरीही परीक्षा दिली जाते. काहीजण पहिले येतात, पैकीच्यापैकी मार्क मिळतात. तर काही जणांना परत परीक्षेला बसावे लागते. ‘कॉमन सेन्स् इज् नॉट सो कॉमन’’ असं म्हणतात ते उगीच नाही. सगळ्यांनी काळजी सगळ्यांना घेऊन, सुद्धा पाच वेळा लॉकडाऊनची (Lockdown) नामुष्की आपल्यावर आली. याचा अर्थ उघड आहे. प्रत्येक जण प्रतिबंधात्मक काळजी घेतच असतो. पण तरीही काहीजण कमी प्रमाणात घेतात. कदाचित ..

ठीक आहे न घेण्याचे कारण त्यांचं अज्ञान किंवा चालतं ही वृत्ती असावी. पण यातून काही त्रुटी राहून जातात. आणि त्यांच्या त्या त्रुटी मधून या विषाणूंचा संसर्ग होत राहतो ...

आम्ही कित्येक कारखाने पाहिले आहेत की जिथे स्वच्छता महत्त्वाची नाही, दुर्लक्षितच. “आमच्याकडे काम करणारी माणसं आहेत, साफसफाई करायला लोकांना वेळ नसतो. ही थोडीशी घुळ राहिली, तर आपण साफ करायचं. त्यात काय ?” असा त्यांचा विचार असतो. प्रत्येकाने साफ करायला काहीच हरकत नाही. पण काही लोक अशी असतात की ज्यांना धुळीची अ‍ॅलर्जी असते. त्यांना साफ करायला लागलं, तर त्यांच्या हॉस्पिटलची बिले आपल्याला द्यावी लागेल, हे लक्षात घ्या. कोविडच्या वेळी तर यांच्यासह आपणास बाधा होते. व्हलनरेबल मेंबर्स (Vulnerable members) - कमजोर माणसं - ह्या गटात येतात. अ‍ॅलर्जी (allergy), बि.पी., मधूमेह अशीच काही दुखणी आहेत. त्यांची काळजी आपण घेतलीच पाहिजे. त्याच बरोबर साफसफाई करतात, त्या लोकांची आपण काळजी घेणे आवश्यक आहे. हा जरी काॅमन सेन्स् असला, तरी खूप कमी फॅक्टरीमध्ये याचा वापर दिसतो.

वॉशची माहिती आम्ही आमच्या वेबसाईटवर (https://www.zeninternational.systems/WASH) आहे. सर्वांना पाहता येईल. शिकताही येईल. त्रास असेल तर सुधारणा करण्यासाठी हे वापरा. हे सोपे नाही.... यासाठी हवी शिस्त...

जगात आपण कसं वागावं, हे बालवाडीतच मनाचे श्लोक शिकताना आपण शिकलो असतो. पण किती जण हे केव्हाच सोडून देतात. आयुष्यभर त्याचा वापर करतात का? खोटं बोलू नका. दुसऱ्याला दुखवू नका. प्रामाणिक रहा. ही सारी तत्त्व व्यवसाय करताना मागे पडतात का?

लवचिकता हा खूप महत्त्वाचा गुण व्यवसायिकांच्यात असलाच पाहिजे. कुठल्याही आघातांना खचून न जाता . पुन्हा नव्याने सुरवात करायची ताकद त्यांच्यात असलीच पाहिजे. त्यांच्यावर काही कुटुंब अवलंबून असतात. आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी फार मोठी ठरते. तिथे व्यवसायिकांनी आपला लवचिकता किंवा स्वतःला जाणून घेण्याची व संकटांवर उपाय शोधण्याची कुवत दाखवलीच पाहिजे. जर लोकांना कामावरून काढून टाकणं किंवा कमी पगार देणे - अशा काही उपायांचा वापर केला असेल, त्यांचा संस्थेच्या कर्मचारी सहभागावर याचा नक्कीच परिणाम होईल. सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेऊन या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण माझ्या एका ग्राहकाकडे वाईज बायोमेट्रिक सिस्टीमस् (WYSE Biometrics Systems)मध्ये मला पाहायला मिळाले. थंब रीडर बनवणारी ही कंपनी आहे. करोनामुळे आता कॉन्टॅक्ट टाळायचे तर कॉन्टॅक्टलेस (Contactless) उपकरण बदलून, त्यांनी फुकट आपल्या सर्व ग्राहकांना देऊ केले. त्यांच्याकडे त्यासाठी आवश्यक ते सॉफ्टवेअर तयार होतं. आणि यात काही जास्त हार्डवेअर लागतच नाही. त्यामुळे ग्राहकांची अपेक्षा पूर्ण करणारे, यापेक्षा उत्कृष्ट लवचिकता दाखवणारे उदाहरण असू शकत नाही. सहाजिकच चायनीज आणि कॉपी-पेस्ट करणारे जे उत्पादक होते त्यांचे पितळ उघडे पडले.

या कोविद-परीक्षेत वाईज बायोमेट्रिक सिस्टीमस् यशस्वी झाले आणि त्यांनी त्याचा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून दिला.

नाविन्यपूर्ण कल्पना सतत तुम्हाला यश देतात हे परत सिध्द झाले. यांच्या सहभागाने चर्चा सत्रानंतर सर्वांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेण्यास सुरुवात केली.

महाराष्ट्रात पहिले पेंट क्षेत्रात झेड मिळवणारे कोरोकोटचे रासने सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डाॅ. अर्चना यांच्या सहभागाने एक नवी दिशा दाखवली. त्यांचे अनुभव खुपचं बोलके आणि उपयुक्त होते.

शिस्त हा योगायोग नाही. कठोर परिश्रम आणि जिद्द, सातत्य याच्या मदतीने आपण काहीही यशस्वी करू शकतो . हे यातून परत एकदा सिद्ध झाले हाच विचार मांडणाऱ्या पुढील विचार 'वन मिनिट प्रिंसिपल' याचा आपण विचार करू.

दहा दिवस हा प्रयोग सगळ्यांनी मिळून करायचा आहे. एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय पण जमतच नाही, कळतंय पण मन वळत नाही असं वाटतंय. अशी एकच एक सवय, चांगली गोष्ट निवडा. या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा. लहान किती तर अक्षरशः काहीतरीच काय, फक्त इतकंच असं वाटेल, बालिशपणा वाटेल इतका लहान भाग.

1. रोज एका पुस्तकाचं एकच पान.

2. रोज एकच सुर्यनमस्कार.

3. रोज एक योगासन.

4. रोज पाच मिनिट मेडिटेशन.

5. रोज दोन स्पेलिंग पाठ करणे.

6. रोज चांगल्या अक्षरात दोन ओळी लिहिणे.

असंच.. कितीही... काहीही..

या अक्षरशः एका मिनिटाच्या व्रताने पुढे काय बदल होऊ शकेल हे प्रत्यक्ष अनुभवानेच समजून घ्या. रोज दिवसभरात कधीही एकदा तो एक मिनिट ते ठरवलेलं काम करायच आहे.

21 दिवसात साधारण सवय लागते... त्यामुळे संकल्प 21 दिवसांचाच करा.

काय आहे वन मिनिट प्रिसिंपल? कायझेनचे जनक Masaaki Imai यांचे. हे तंत्र.

वेळेच्या नियोजनात आजवर शिकलेल्या सर्व युक्त्यांपेक्षा अतिशय सोपी युक्ती म्हणजे, ‘वन मिनिट प्रिन्सिपल’

Masaaki Imai यांनी 'वन मिनिट प्रिन्सिपल’ चा शोध लावला आणि आज जपान या तंत्राचा अवलंब करत यशाची शिखरे गाठणारा देश ठरला आहे. आपण वेळेच्या नियोजनात अपयशी ठरतो त्याचे कारण सातत्य ठेवण्यात कमी पडतो. त्यामुळे अपराधी भाव येतो तो वाढत वाढत आत्मग्लानीचं रूप घेतो, आपण काही करू शकत नाही आपल्यात जिद्द नाही, आपण एखादे काम करण्यास लायक नाही अशी नकारात्मकता आपल्याला ग्रासून टाकते. अशा वेळी एखाद्या जादूसारखी ती टेक्निक काम करते. मला एका मिनिटात वेळेचे नियोजन शिकवा म्हटले तर मी हा नियम शिकवेन. काय आहे सूत्र?

तर सवयी किंवा आयुष्यातला बदल हा अचानक होत नसून तो सावकाश पण नियोजनपूर्वक शहाणपणाने करायला हवा, सातत्य आणि सराव यासाठी नियमित योजना असते. नेमाने जप, पोथी वाचून, श्रावण महिन्यात प्रवचनमाला, काकड आरती, ही आपली कर्मकांड नसून या तंत्राचा आध्यात्मिक वापर होत आहे.

आत्मविश्वास देणारा हा नियम म्हणजे 60 सेकंद दररोज एखाद्या ध्येयासाठी वापरा. आपल्याला हसू येईल, विश्वास बसणार नाही पण दररोज एक मिनिट हा चमत्कारासारखे रिझल्ट देतो. काय आहे नियम तर...

Every day

At the same time

Just for a minute

दररोज ठराविक वेळी फक्त एक मिनिट कोणतेही ध्येयाशी संबंधित एखादे काम पूर्ण करायचे असेल तर व्रत घेतल्यासारखे ते करायचे हे यशाचे सूत्र आपण जाणतो. पण त्यासाठी एकदम दोन तास, एक तास अशा तासांच्या भाषेत हट्टीपणा करतो आणि मन बंड पुकारते. कधीकधी परिस्थितीची साथ नसते. अशा वेळी एक मिनिट फक्त एक मिनिट करायचे आहे हे ठरवताच हसत हसत आपण तयार होतो. मनाची साथ मिळते आणि तेवढा वेळ सहज काढू शकू असा आत्मविश्वास तयार होतो. आता कामाला/कृतीला सुरुवात करायची. एक मिनिट काम करायचे आणि अक्षरश: बाजूला ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी परत तेच. गंजलेल्या चाकाला रोज एकदा फिरवायचे, बंद पडलेल्या गाडीला रोज एकदा फक्त सुरु करायची, रोज एक पान वाचायचे, रोज पाच ओळी लिहायच्या, रोज एक श्लोक वाचायचा, रोज एक काहीही छोटेसे..

जमेल? सोप्पं आहे ना? हो नक्कीच!

एकदा मोमेंटम - गती मिळाली की ते काम झपाट्याने पूर्ण होईल. हा प्रयोग करून तर पहा, अनुभव घ्या. मी तेच करत आहे, वेळेच्या नियोजनावर रोज थोडसं वाचायचं आणि थोडंसं लिहायचं... हाच माझा नियम. आयुष्य बदलुन जाईल .

करोनासारख्या अज्ञात संकटांवर मात करण्यासाठी, नुकसान करणाऱ्या वाया जाणाऱ्या घटकांवर उपाय शोधण्यासाठी, आरोग्याच्या चांगल्या सवयी जोपासण्यासाठी, या विचारांची तुम्हाला मदत होईल अशी अपेक्षा.

अर्थात सगळं मला समजते. हा तर काॅमन सेन्स् आहे असे म्हणतात त्यांना कोण काय सांगणार? ....

चेंबरच्या सर्व मदतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात हेन्केल, कात्रज डेअरी, झेन, रामॅलेक्स, वाईज बायोमेट्रिक सिस्टीमस्, कोरोकोट, आकार फाउंडरी, एल. इ. डी. (LED) बनवणारे जोशी यांच्यासारखे पुणे, नगर, औरंगाबाद येथील सहभागी झालेल्या सर्व संबंधितांची प्रतिक्रिया या कार्यक्रमाचे यश दाखवतात.

सर्व आपल्या कामात एवढे व्यस्त होते तरी ही या सहभागी झालेल्या सर्व संबंधितांनी मार्गदर्शन तसेच काही कारणाने सहभागी न होऊ शकलेल्यांच्यासाठी परत प्रशिक्षण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पुढील महिन्यात MCCIA ने WASH वर ट्रेनिंग नियोजिले आहे.

एका मिनिटात वॉश

काम चालू करोना बंद।।

कामाच्या जागी पंधरा नियमांचे काटेकोर पालन करा आणि करोना प्रसार बंद करा ।।

आपल्या कारखान्यात पंधरा नियमानुसार चेकिंग झाले आहे का? नसेल तर कामाला जाण्याआधी आजच संपर्क करा ।।

WORKPLACE ASSESSMENT for SAFETY and HYGIENE (WASH) ची नियमावली समजून घ्या आणि सर्वांना सांगा.

लक्षात असू द्या, करोनाचे पूर्ण उच्चाटन होणे आवश्यक आहे..

आपण जर दूध, खाद्यान्न, भाज्या, घरकाम, दवाखाना, इत्यादि रोजच्या जीवनावश्यक वस्तु संबंधित जागांवर कामाला जाता असाल तर लक्षात असू द्या, एक करोना बाधित व्यक्ती तुमच्या गटाला आणि तुमच्या वस्तुद्वारे संपूर्ण समाजाला धोक्यात आणू शकते.

रात्र वैर्याची आहे, जागे व्हा, करोना सतत प्रसारित होऊ शकतो. थांबवण्यासाठी घरी थांबलेल्या आपल्या आईबाप आणि मुलांसाठी कामाला जाणाऱ्यांनी आपल्या कामाच्या जागी पंधरा नियम अंमलात आणले आहेत - याची खात्री करा.


१ जवाबदारीची जाणीव

२ कायद्यानुसार वागणुक

३ काम चालू कसे ठेवावे

४ करोना संकट व्यवस्थापन

५ अंतर्गत संवाद

६ संपूर्ण स्वच्छता

७ खबरदारी

८ प्रशिक्षण

९ कचरा नियोजन

१० शुध्द हवा

११ सामाजिक संपर्क

१२ पुरवठादार संपर्क

१३ वाहतुक व्यवस्था

१४ नोंदी

१५ नि:पक्षपातीपणा

अधिक माहिती साठी आजच संपर्क करा. मराठीत भाषांतर केले आहे, हे सर्व कामाच्या जागा विशेषतः मंडई, दूध संकलन कारखाने, होलसेल भंडार , वर्तमानपत्र, भाजी वाहतुक, कुरिअर सर्विस इत्यादींसाठी आवश्यक आहे.

माहिती युगात गरजेची १५वी विद्या - माहिती सुरक्षा

25 जुलै 2018 रोजी मराठा चेंबर्स मधे स्किल आणि एम्प्लॉयमेंट बद्दल आय टी (IT), कॉम्पुटरतज्ञांचे आणि एच आर (HR) क्षेत्रातल्या तज्ज्ञांची एक बैठक - चर्चासत्र झालं त्यावेळी सर्व तज्ञांनी एक मताने मान्य केलं की डिग्रीपेक्षाही वृत्तीला या क्षेत्रातील महत्त्व आहे. तुमची वृत्ती किंवा अटीट्युड, शिकण्याची पद्धत आणि काहीतरी करून दाखवण्याची कुवत हे नोकरीसाठी खूप महत्त्वाचे. नोकरीच्या बरोबरीने स्वतःही काही सुरू करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या माहिती सुरक्षा किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टीम कौशल्य आवश्यक आहे. करोनाच्या दिवसात जगभरात सायबर क्राईम खूप प्रमाणात वाढले आहेत.त्याच्या नियंत्रणा साठी याचं महत्त्व खूप आहे.

वाढते डिजिटाझेशन संगणकावर काम, सोशल मीडिया, लाॅक डाऊनमुळे ऑनलाईन काम सगळ्यांनी सुरू केले आहे.

वर्क फ्रॉम होमचे (Work from home) फायदे फारच आहेत.पण योग्य नियंत्रण नसल्यास माहिती चोर - हॅकर्सना आपण दार उघडले आहे.

माझ्या संगणकावर काही महत्त्वाच्या गोष्टी नाहीत, असे म्हणताच येणार नाही.

तुमच्या कारखान्यात असलेल्या नेटवर्कचा वापर करून हॅकर काहीही चोरू शकतो.

तक्षकाने अळीच्या रुपाने बोलावून शिरून परिक्षिताचा जीव घेतला तसेच काहीसे धोका निर्माण करणे हॅकरला शक्य आहे.

आय टी कंप्युटर क्षेत्राचा वापर सर्वत्र पसरला आहे. यामुळे संगणक प्रशिक्षणासाठी आय एस एम एस (ISMS) - इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टीम याचं महत्त्व खूप आहे.

१८ नियंत्रण घटकांच्या मदतीने आपल्या माहिती सुरक्षा योजनेचं नियोजन कारवाई तपासणी, सुधारणा - पी डी सी ए (PDCA) - चक्र वापरून माहिती सुरक्षा साधता येईल.

आयुष्यात आवश्यक कौशल्य म्हणजे १४ विद्या आणि ६४ कला बरोबर आता स्वतःच्या माहितीची सुरक्षितता ही कला नव्याने आवश्यक ठरत आहे. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट स्टॅंडर्ड फक्त टेक सॅवी लोकांचे किंवा कारखान्याची मक्तेदारी न राहता, सर्वसामान्यांची अत्यावश्यक गरज ठरत आहे. त्याचमुळे सर्वांना त्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. आणि मिळेल तशीची ओळख करून घेणं आवश्यक ठरतं आहे. फक्त चुकीचं ज्ञान किंवा अर्धवटज्ञान हे अज्ञानापेक्षा घातक असते. आणि त्याचमुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने याची माहिती करून घेणं खूप आवश्यक आहे.

बहुसंख्य लोकांच्या आयुष्यात त्यांचे आयुष्य सोपे करणारे म्हणून सहज प्रवेश केलेल्या सोशल मीडिया किंवा बँकिंग, इन्शुरन्स, ऑनलाइन बिल्स्, गुगल पे, भीम आदी यूपीआय सुविधा, मोबाईल ट्रांजेक्शन या साऱ्या गोष्टींच्या वापराबरोबरच त्याबरोबर असलेले धोकेही आहेत हे बहुतेकांना माहिती नसतं. अशा अनेक मार्गांनी बघता बघता आपल्या आयुष्यात डिजिटायझेशन आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. आता माहितीची सुरक्षितता ही फक्त आय टी क्षेत्रातील व्यक्तींपुरती मर्यादित न राहता, ही माहिती सुरक्षा सगळ्या कारखान्यांना, शाळा, हॉटेल, हॉस्पिटल्स, छोटेछोटे विक्रेते यांनाही आवश्यक आहे.

माहितीची सुरक्षितता ही आपल्या स्वतःच्या तसेच व्यवसायाच्या आणि बचतीच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरते.

पूर्वी कधी विचारतं वा स्वप्नातही ना कोणाच्या येईल इतकी माहिती व ज्ञान, एका क्लिकवर एकमेकांशी जोडलेल्या जगभरात कोठेही कोणालाही मिळत आहे. साहजिकच या वाढत्या सुलभतेने आणि बहुतेकांच्या कमी जागरूकतेने देशांतर्गत व विशेषतः आंतरराष्ट्रीय माहितीविषयक गुन्हे वाढले आहेत. त्याच्यामुळे सायबर क्राईम, माहितीची चोरी आणि त्यावर अवलंबून गुन्हेगारी विरुद्ध जर आपल्याला साक्षर आणि तयार व्हायचं असेल, तर आपल्या माहितीचे व्यवस्थापन सायबर सिक्युरिटी किंवा करून घेणे आवश्यक ठरते. कॉम्प्युटर, डिजिटायझेशन ,आयपॅड, मोबाईलयाचा वापर होत नाही, असं कुठलं घर किंवा कुठला व्यवसाय असू शकत नाही.

जवळजवळ जगभर पसरलेल्या वाहन उद्योगातसुद्धा याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

निर्यात करणारे किंवा परदेशी ओरिजनल असलेल्या संस्थांसाठी काम करणारे छोटेछोटे कारखानदार या माहितीच्या जाळ्यात आता येत आहेत. ऑटो जायंटच्या डिझाईन मध्ये काही भाग पुरवण किंवा त्यांनी बनवलेला डिझाईन वापरून आपण काही भाग पाठवत असतं तर सहाजिकच दोन कंपन्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण अपरिहार्य आहे. आणि या देवाण-घेवाण सुरक्षिततेच्या मध्ये काही त्रुटी राहिल्या तर त्या भाग बनवणाऱ्या कंपनी बरोबरच, या मोठ्या कंपन्यांची सुरक्षितताही धोक्यात येणार, हे लक्षात घेऊन, तुम्हाला जर या कंपनीबरोबर काही व्यवहार करायचा असेल तर तुमच्या संस्थेला सुद्धा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टीम किंवा आय एस एम एस च्या धर्तीवर स्टॅंडर्ड आणि नियंत्रण पद्धत वापरणे आवश्यक आहे.

सर्टिफिकेशन किंवा त्याचे सुरक्षा नियम जमले नाहीत तर सहाजिकच या संस्थांना पुरवठादार म्हणून मान्यता मिळत नाही. बघता बघता इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि बिझनेस काँटिण्यूटी हे परवलीचे शब्द व्यवसाय वाढीसाठीच नव्हे तर, व्यवसाय सुरक्षिततेसाठी पासवर्ड - परवलीचे शब्द ठरत आहेत. माहिती सुरक्षितता समजून घेणे, त्यातले पारिभाषिक शब्द - वापरले जाणारे शब्द समजून घेणे, व असे प्रचलित शब्द आता प्रत्येक कारखान्यात पोहोचले आहेत. यासाठी सर्टिफिकेशन करण्याची तयारीही प्रत्येक कारखानदार करत आहे. आणि जर करत नसेल तर खूप मोठे आव्हान नकळत स्वीकारत आहे. त्यांच्या व्यवसायाला त्यांच्या अस्तित्वाला धोका आहे याची त्याला जाणीव नाही . असाच याचा अर्थ .

माहितीच्या जगव्याळ जाळ्यामुळे कुठून कोण केव्हा त्याचा गैरवापर कसा करेल ह्याचा सांगणं अवघड आहे.

80 / 90 सालची गोष्ट असेल कॉम्प्युटर युग नुकतेच झाले होते, म्हणजे अख्ख्या पुण्यात फक्त पुणे युनिव्हर्सिटीच्या रिजनल कॉम्प्युटर सेंटर मध्ये कॉम्प्युटर होता. त्या काळातली गोष्ट विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर बघायलाच मिळत नाही. दहा वर्षे गेली कॉम्प्युटरचा पासवर्ड फक्त एच. ओ.डी कडे असायचा आणि कॉम्प्युटरचा वापर विद्यार्थी कसे करतात याच्या नियंत्रण असायचं. अजून दहा वर्ष गेले, बघता बघता जागोजागी एम एस सी आय टी (MSCIT) सारख्या मार्गांनी जवळजवळ प्रत्येक मुलाला संगणक साक्षरता यावे याची काळजी घेतलेली गेली आणि त्यानंतर चोवीस वर्षात आता संगणक संगणक साक्षरते बरोबरीने माहिती सुरक्षिततेचे साक्षरता ही तितकीच आवश्यक ठरते आहे.

तिचा काळजी घेतली गेली नाही, तर बघता बघता तुमच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचे काम हे माहिती चोर करू शकतात. हे सिद्ध झाले आहे. कॉसमाॅस बँक असो, किंवा एखाद्या इन्शुरन्स एजन्सी, किंवा एखादी संस्था असो, फार लांब कशाला आपला चोरीला गेलेला मोबाईल...

आपण कितीही काळजी घेतली तरी त्या माहितीचा गैरवापर आपण थांबवू शकत नाही. किंबहुना तुमचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, ऑनलाइन पेमेंट किंवा देवघेव/काढणे जितका आपल्याला सोपे आहे तितकाच चोराला ही. पूर्वी पैसे बरोबर घेण्यापेक्षा कार्ड बरोबर घ्यावं असं वाटायचं. पण त्या कार्डचा पासवर्ड लक्षात राहत नाही, म्हणून पाकिटात कुठेतरी तर लिहून ठेवलं असेल, तर पाकीट मारले जाते त्याचबरोबर तुमच्या बँकेत सारी रक्कमही मारले जाते हे नक्की झालं असतं.

अशा अनेक तक्रारी आल्यावर बँकांनी 2 फॅक्टर अथेंटीकेशन यासारख्या योजना राबवल्या आहेत, तरी त्यावर माहिती चोरांनी उपाय शोधून काढले आहेत. तुम्ही जितके नियंत्रण लावला तितकेच किंवा त्यापुढे एक पाऊल पुढे गुन्हेगारी वृत्तीचे लोक असणार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की, आपण चोरांसाठी दरवाजा उघडा ठेवावा. काहीतरी नियंत्रण हे लावलाच पाहिजे. या सगळ्याला चोरीला गेल्यावर काय करायचं हे उपाय योजले असतात त्यापेक्षा या गोष्टी या गोष्टी चोरीला जाऊ नये म्हणून घेतलेली खबरदारी ही जास्त सोपी असते. अशावेळी त्याचा पासवर्ड त्याचा ठिकाणी ठेवण्याच्या चुका करणारे खूप लोक आहेत. चोरीला गेलं पैसे काढण्यासाठी तुमच्याबरोबर चोरांनाही त्याचा उपयोग होतो. फक्त कॉम्प्युटर चा वापर थांबवणं हा पर्याय आता अशक्य होता इंडस्ट्री फोनच्या जमान्यात तुम्ही 2 दशकं किंवा दोन शतके मागे जाऊ शकत नाही आणि जेव्हा कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य आहे तेव्हा त्यांची काळजी घेणं तितकंच आवश्यक ठरते. आपल्या संस्थेचे ज्ञान-अक्षर प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्यासाठी फक्त पेटंट हा मार्ग आता पुरेसा ठरला नाहीये, तर माहितीचे संरक्षण आणि त्यासंदर्भात योग्य ते नियंत्रण आता अत्यावश्यक ठरत आहे. लवकरात लवकर कुठल्याही क्षेत्रात असलो की विद्यार्थी, गृहिणी असलो तरी पण हे ज्ञान मिळवून आपला आयुष्य सुखकर झाला नाही तर किमान योऊ घातलेले धोके आपण टाळले पाहिजेत.

आम्ही आजवर अनेक लोकांना यासाठी मदत केली आहे आणि यापुढेही करत राहू सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने अत्यंत कमी किमतीत आम्ही प्रशिक्षण आयोजित करत आहोत. आणि अपेक्षा आहे तुमच्यासारख्या अनेक व्यक्ती लवकरात लवकर आपल्या संगणकाच्या किंवा सोशल मीडियाच्या किंवा कुठल्याही माहितीच्या माध्यमातून स्वतःची आणि आपल्याशी जोडले कोणाचेही किंवा कुठल्याही संस्थेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतील. आपले व्यवहार आणि आपल्या संबंधित व्यवहार आणि सुरक्षित बनतील.

पर्यावरणपूरक वाढीकडे वाटचाल

देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो ही पूर्वीची गाणी काळानुसार बदलायला लागली आहेत. आकाशात प्रदूषणाचे ढग आले आहेत. तर सूर्यही ग्लोबल वाॅमिंग- जास्त तापमान याचा विचाराने झाकोळत चालला आहे. ओझोन लेयर असलेली छत्री भेदून, येणाऱ्या अतिनील सूर्यकिरणांनी कॅन्सरचा धोका वाढतो आहे. ही छत्री भेदण्याचं काम करणारे सीएफसी (CFC) किंवा ग्रीन हाऊस गॅसेस वाढत्या कारखानदारीचा प्रसाद आहेत. जमीन नापीक होत चालली आहे आणि पाण्यातही प्रदूषण वाढतेच आहे. हवे बरोबर येणाऱ्या पोल्युशन मध्ये किंवा घातक कचरा प्रदूषणामध्ये अनेक आजार पसरवण्याची जणू शक्ती आली आहे. साथी आणि साथीचे आजार यांचे प्रमाण वाढते आहे. पर्यावरणाचे परिणाम जीवनदायी न होता जीव घेणे होऊ लागलेत. अनेक समस्या यातून निर्माण झाल्यात. जीवनदायी पाऊस आता ऍसिड रेन किंवा आम्लं पावसातमध्ये परावर्तित झाला आहे. एकंदरीतच देवाने दिलेल्या या सुंदर पर्यावरणाचा किंवा वसुंधरेला माणसांनी अत्यंत भीतीदायक असे स्वरूप निर्माण केले आहे. कारखानदारीच्या वाढत्या मागणीनुसार वारेमाप नैसर्गिक साधनांचा वापर करून प्रदूषण आणि कचरा दोन्ही वाढवत, माणसांनी माणसाचं जगणं आता नको करून सोडले आहे. याचा अर्थ कारखान्यात तयार होणारे उत्पादन आणि प्रदूषण दोन्ही थांबायचं का? नाही.कारखानदारी विज्ञान या सगळ्या गोष्टींची आवश्यकता कोणीच नाकारत नाही पण पर्यावरण विसरलेली प्रगती काय उपयोगाची? प्रगती बरोबरीने आपल्याला पर्यावरणाला धरून पुढे जायचं आहे.विज्ञानाची प्रगती आता पर्यावरण पूरक हवी. पर्यावरण मारक वा घातक नको आहे. आणि या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे कारखान्यांना आवाहन करणं भाग आहे.

अजिबात प्रदूषण नाही. कारखान्यात उत्पादन बंद काम नाही, असा अतिरेकी विचार उपयोग नाहीये. प्रत्येकाने जाणीवपूर्वक आपल्या कामातून कमीत कमी पर्यावरणाला त्रास कसा होईल याची काळजी घ्यायची आणि ही काळजी कशी घ्यायची यासाठी अनेक स्टैंडर्ड प्रसिद्ध झाली आहेत. सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यात सुलभ अशा इ एम एस (EMS) या मानकाचा आपण विचार करूयात.

हवा, पाणी, जमीन प्रदूषित करणारी कचरा निर्माण करणारी, जी कुठले साधन, कृती वा परिणाम आहेत त्याचा विचार आपल्या कामाशी जोडून, जास्तीतजास्त घातक परिणाम करणाऱ्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळणे यात अपेक्षित आहे. यासाठी पाहिजे सगळ्यांनी मिळून निश्चित दिशेने वाटचाल करणे. अतिशय त्रासिक गोष्टी जाणीवपूर्वक टाळणे, मध्यम स्वरूपाच्या गोष्टी व्यवस्थापनाच्या मदतीने सुधारणांच्या मदतीने नियोजन पुर्वक कमी प्रमाणात आणण्याची धडपड करणे यात अपेक्षित आहे. यासाठी सतत सुधारणा केल्या पाहिजेत. पर्यावरणावर आधारित निर्णय घेण्यात आला पाहिजे. पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा म्हणजेच अस्पेक्ट आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा म्हणजे परिणामचा (ईंपॅक्ट- impact) विचार आपल्या प्रक्रियांची आपल्या कृतीविषयी, आपल्या उत्पादनाविषयी, आपल्या उत्पादन साधनांची ,जोडून जेव्हा योग्य नियंत्रण पद्धती लावली जाईल, परिणाम नियंत्रण करणे आणि ते पुन्हा पुन्हा तपासून चुका सुधारण्याची सुरुवात होईल, तेव्हा आपण केलेली कृती पर्यावरणाला धरून असतीलच.

सहाजिकच प्रगती आणि पर्यावरण दोन्ही मुद्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येक स्टैंडर्ड प्रमाणे याची सुरुवात संस्थेचे संदर्भ, इतर हितैषिंच्या अपेक्षा, सिस्टीम मर्यादा अथवा सीमा (स्कोप - Scope), प्रक्रिया, याबरोबर टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट - उच्च व्यवस्थापनाची बांधिलकी यांनी होते. व्यवस्थापन कटिबद्ध असेल आणि त्यांची कटिबद्धता त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून त्यांच्या सहभागातून त्यांनी आयोजलेल्या सुधारणा प्रकल्पातून त्यासाठी आवश्यक मदत देण्याने त्याचा आढावा घेणे योग्य साधने पुरवणे या माध्यमातून दिसते. लोकांना प्रोत्साहित करून त्यांचा विचार हा तात्पुरता आजच पैसे वापरून नफा कमवायचा असेल, तर पर्यावरणावर घातक परिणाम होऊ शकतात. प्रत्येक वर्षी ध्येयधोरण (Objectives) निश्चित करून, धोरणांच्या मदतीने प्रत्येकाला जवाबदारी नेमून देऊन, योग्य नियोजनाच्या मदतीने सुधारणा प्रकल्प राबवला, तर हे सहज शक्य होईल.

सरकारने देशात सी पी सी बी (CPCB) सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि आपल्या राज्यात एम पी सी बी (MPCB) महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या मदतीने अनेक नियम निश्चित केले आहेत . प्रत्येक कारखाना आता कुठल्या ना कुठल्या तरी कन्सेंट कॅटेगरीमध्ये येतो. आणि त्याला कुठली ना कुठली तरी नियमावली लागू होते. याची जाणीव सर्वांना झालीच पाहिजे आणि ह्या नियमावली मधल्या व्हाईट कॅटेगरी (White Category) मध्ये इलेक्ट्रिक उत्पादन येतात. इलेक्ट्रिकल वेस्ट विल्हेवाटीसाठी थोडीथोडी प्रगती आणि थोडीथोडी पर्यावरणपूरक प्रकल्प त्यांनाही लागु आहेत. त्याचप्रमाणे ग्रीन, ऑरेंज,आणि रेड अशा दर्जाची नियम नियंत्रण नियमावली ठरविली आहे. दर वर्षी थोड्या सुधारणा केल्या, तर आपल्या प्रगतीला कोणीही विरोध करणार नाही.

सर्वांच्या सहभागातून आपण योग्य पर्यायातून योग्य पर्यावरण पुन्हा एकदा निर्माण करू शकतो आणि मग परत एकदा सगळे आनंदाने म्हणतील

देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो.

सुंदर तंत्रज्ञान, सुंदर पर्यावरण , सुंदर प्रकल्प आम्ही करतो. सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सुंदर हवा ही सुंदर जमिन, सुंदर विज्ञान, सुंदर जीवन आम्ही राखू. .....

कामा संदर्भातील आरोग्य सुरक्षातेतील जोखिम व धोके

आय एस ओ पंचेचाळीस हजार एक (ISO 45001) हे ऑक्युपेशनल हेल्थ ऍन्ड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम (Operational Health & Safety Management System) मानक/स्टॅंडर्ड आहे. मराठीत यांचं भाषांतर व्यावसायिक आरोग्य सुरक्षा व्यवस्थापन पद्धत आहे. यात व्यवस्थापनात कामगाराची सुरक्षा, व्यवसायाच्या सुरक्षिततेमध्ये अपघात किंवा रोग्यांना दूर कसे ठेवायचं याचा विचार केला जातो. यात आजार फक्त शारीरिक नसून मानसिक आरोग्यावर होणारे परिणामांचाही विचार केला जातो .

आता तसं म्हटल्यावर प्रत्येकाच्या लहरीनुसार त्यांचे स्वास्थ जपण्याची जबाबदारी संस्थेवर येते का? निश्चितच नाही. पण सर्वसामान्य कामगाराची, टॉप मॅनेजमेंट चेअरमन पासून ते गेटमन पर्यंत सर्वांना कामगार असंच म्हणतात, मजूर ठेकेदार, अभ्यागत व्हिजिटर तसं सर्वांना त्यांच्या कामाच्या जागी त्याच्या कामामुळे वा परिस्थिती मुळे कुठलाही धोका, गैरसोय वा आजाराला, अपघाताला कारण ठरेल अशा कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यावे लागू नये म्हणून संस्थाचालकांनी काळजी घ्यावी हे अपेक्षित आहे.

घसरणे, पडणे, धडकणे, कापणे, भाजणे, अशा कुठल्या कुठल्या घटना असू शकतात - त्याला फिजिकल किंवा शारिरीक धोके म्हणतात. हे चुकीचे वागणे किंवा चुकीच्या परिस्थितीने होऊ शकतात. एखाद्या धारदार वस्तू उघडी असेल त्यांनी कापू शकते. हातोड्या सारखा एखादा गोष्ट हातावर पडला तर एखाद बोट तुटू शकते. उंचीवरून पडला तर जखम वा मृत्यू ही होऊ शकतो. या परिणामांचा विचार, वारंवारता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन योग्य नियंत्रण, नियमावली नियोजन , सुधारणा करणे या व्यवस्थापनात येतात. त्याला मेकॅनिकल कारणे असेही म्हणतात. दुसरा आहे बायोलाॅजिकल किंवा जैविक यात जीवाणू, विषाणूंचा संसर्गाने होणारे आजार येतात.

तिसरा आहे संपर्कजन्य. यात उर्जा जसं वीज, वाफ, दाबाच्या खाली असलेली हवा त्याच्या संपर्काने होणारे धोके लक्षात घेतात. घातक उपकरण, मटेरियल, मशिन, वातावरण, प्रक्रिया, याचा विचारही यात केला जातो. याशिवाय मानवनिर्मित, नैसर्गिक आपत्तीचा विचार करणं आवश्यक आहे. जसे पुर,भूकंप, दहशतवादी हल्ला, संप, दंगल या सगळ्या गोष्टींबरोबरच प्रवासात असणारे धोके, क्रेनने, फोर्क लिफ्टने अवजड सामान उचलताना, इकडून तिकडून चालवताना असणारे धोके लक्षात घ्यावे लागतात. थोडक्यात तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात आणि प्रत्येक परिस्थितीत असलेले धोके लक्षात घेऊन त्याचे मूल्यांकन करून, त्याची प्राधान्य सुची निश्चित करून, त्याच्यावर सुधारणा योजना, त्याचं मॉनिटरिंग किंवा केव्हा तपासणी करून आणि त्या संदर्भात असलेल्या सर्व कायद्यांचे पालन केल्याने तुमच्या आणि तुमच्या कारखान्यातल्या सर्वांच्या आरोग्याची हमी तुम्ही देऊ शकता. स्टिच इन टाईम किंवा दुर्घटनेपेक्षा खबरदारी बरी हे लक्षात आल्याने खबरदारीची योजना म्हणजे सुधारणा आणि तपासणी सांगणारे हे अपघातच्या आधीच काय काय होऊ शकतो याचं विश्लेषण करणारे त्यावर उपाय योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल हे मानक आहे. यातून नियंत्रण केला जाते. लोकांना आवश्यक असे प्रशिक्षण दिलं जातं आणि आपत्ती काळात कसं वागायचं हे प्रशिक्षण असल्यामुळे हे प्रशिक्षित लोक स्वतः बरोबर दुसऱ्याचे जिवाचे हे खूप काळजी घेऊ शकतात.

कारखान्यातील तापमान, प्रकाश, खेळती हवा, या सर्व गोष्टी फॅक्टरी ॲक्ट मध्ये दिले आहेत त्याचं पालन तुम्ही करायला हवे. बसण्याचे वजन उचलण्याचे नियम अरगोनाॅमिक्स (Ergonomics) तर्फे लोकांना शिकवले जातात. कन्सेंट आणि फॅक्टरी ऍक्ट मधल्या तुम्हाला लागू होणाऱ्या सर्व कायद्यांची एक सूची तुम्ही करा. आणि त्याचं पालन करत असल्याचे पुरावे आणि नोंदी ठेवा. सुचवा, नियमावली, तपासणी, ऑडिट असतात त्यातही सर्वांना सहभागी करून घ्यावे. प्रथमोपचाराचे शिक्षण आणि प्रथम उपचार पेटी तुमच्या कारखान्यात असलीच पाहिजे. आग प्रतिबंधन, अग्नीरोधन, वापर, जागा, तसेच कुठल्या कुठल्या आपत्ती येऊ शकतात, आणि त्याचं कसं नियोजन करायचं - या संदर्भात आपत्ती योजना सुचनाही तयार केल्या पाहिजेत. लोकांना त्याचं प्रशिक्षण दिले पाहिजे . जोखिम म्हणजे रिस्क आणि धोका म्हणजे हझार्डचा विचार करून, त्याची प्रधान्य सूची बनवा.

चार टी (4T) हे नियंत्रणाची उतरंड सांगणारे टि (T) या आद्याक्षर असलेले चार इंग्रजी शब्द आहेत.

पहिला टेक्नॉलॉजी अथवा तंत्रज्ञान. यात उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून धोका कायम चा टाळणे पर्याय शोधणे आवश्यक आहे. हे शक्य नसल्यास

दुसरा ट्रीटमेंट (Treatment) त्यात ऍडमिनिस्टेटिव (Administrative) - धोरणात्मक आणि इंजिनिअरिंग - अभियांत्रिकी या दोन उपाय योजना येतात. धोका आहे तिथे प्रवेश बंदी, वेळात बदल हे धोरणात्मक तर गार्ड बसवणे, प्रदिप , सेन्सर इ इंजिनिअरिंग उपाय आहेत. हेही शक्य नसेल तर तिसरा पर्याय.

तिसरा ट्रान्स्फर म्हणजे बदल, तुमच्या ऐवजी अधिक कुशल मनुष्याला हे काम देणे किंवा विमा योजनेत सहभागी झाले कि धोका त्या संस्थेत देण्यात आला हे पर्याय येतात. कुठल्याही पर्याय नसल्याने

शेवटचा अथवा चवथा आहे पी पी इ (PPE - Personal Protective Equipment) - सुरक्षा साधनांचा वापर.

चार टी (4T)च्या मदतीने सुधारणा प्रकल्प राबवत शून्य अपघातच आपल्या कारखान्यात तुम्ही समजू शकतात तर मला वाटतं तुमच्या कारखान्यात येण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असेल.

क्वालिटी स्टॅण्डर्डचा आढावा

१९८७ साली पहिल्या क्यू एम एस (QMS) म्हणजे क्वालिटी सर्टीफिकेशनचे सेलिब्रेशन पार्टी आणि वृत्तपत्र मध्ये बातमीच्या स्वरूपात सादरीकरण व्हायचं. आजमीतिला ग्राहकाच्या अटीनुसार ही व्यवसाय चालवण्यासाठी, टेंडर भरण्यासाठी क्यू एम एस सर्टिफिकेट ही अत्यावश्यक बाब आहे. म्हणजे आता ही कमीतकमी, सर्वसाधारण व्यावसायिक गरज झाली आहे.

सर्टिफिकेट म्हणून हे व्यवसायाच्या सातत्य आवश्यक ठरले आहे. आणि वेळेस मिळालं तर कोणीही पार्टी देत नाही किंवा वर्तमानपत्रात बातमी ही येत नाही. जवळजवळ तीस बत्तीस वर्षे झालेला हा प्रवास.

कॉलिटी मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये झालेल्या बदलांचा आढावा घ्यावासा वाटला म्हणून हा लेख.

सुरुवातीला 'कराल ते लिहा आणि लिहाल ते करा ' अशा साचेबद्ध पढडीतून आणि लिखापढीतून आपली व्यवस्थापन पद्धत सिद्ध करण्याची धडपड होती. प्रत्येक गोष्टीसाठी प्रोसिजर आणि डॉक्युमेंट या शिवाय ऑडिटर सोडा, ऑडिटीलाही चालायचं नाही. १९९४ मध्ये अतिशय चांगला बदल झाला आणि डिझाईनची रेकॉर्ड व्हेरिफिकेशन व्हेलिडेशन यातुन परिणाम आणि बदल नियंत्रण सुरू झाले. 2000 कार्यपद्धतीत महत्व कृतीपेक्षा परिणामांवर दिला गेले. 'दहा पावलं तिकडे चला' म्हणताना प्रत्येकाच्या गतीनुसार उंचीनुसार वेगळ्या जागी प्रत्येक जण पोचतो हे लक्षात घेऊन, त्यामुळे कृतीपेक्षा 2000 साली प्रक्रिया आणि प्रक्रियांचे परिणाम लक्षात घेऊन कृतींचे महत्त्व मर्यादित केले. 'निश्चित केलेल्या डाव्या बाजूच्या दारापर्यंत जा' या सुचनेनुसार परिणाम साधण्यासाठी नियम निश्चित केले. प्रक्रिया आणि परिणाम साधण्यासाठी नियम निश्चित केले. आणि कागदपत्रांच्या बंधनकारक जाचातून थोडा मोकळा श्वास घेतला गेला.

2000 साली त्यामुळे फक्त सहा प्रोसिजर्स (Procedures) ज्यामध्ये सातत्य आवश्यक होतं असं डॉक्युमेंट कंट्रोल, रेकॉर्ड कंट्रोल, इंटरनल ऑडिट, एन सी कंट्रोल, करेक्टिव ऍक्शन, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन फक्त पुरेशा ठरल्या. (Document Control, Record Control, Internal Audit, NC Control, Corrective Action, Preventive Action).

2008 साली परत एक महत्त्वपूर्ण बदल झाला - ग्राहकांच्या गरजा आणि ग्राहकांचे समाधान - बिजनेस प्रक्रियेचे इनपुटआणि आऊटपुट ठरले. तुमच्या संस्थेचे ध्येयधोरण या ग्राहकांच्या गरजांनुसार असली पाहिजेत. आणि तुमच्या बिझनेस प्रक्रियांमधून ग्राहकाला समाधान मिळाले पाहिजे आणि याची तपासणी तुमच्या MRM मॅनेजमेंट रिव्हू मध्ये झाली पाहिजे हे निश्चित केले.

सिडनी मॉडेलने संस्थेच्या परिणामकतेचे परीणाम इफेक्टिवनेस आणि इफिशिअन्सीने (Effectiveness & Efficiency) निश्चित केलं होतं. 2008 साली आठ क्वालिटी मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आणि स्वातंत्र्याने सुधारणा याचा प्रथम उल्लेख आढळतो.

प्लॅन डू चेक अँड अक्ट (PDCA - Plan Do Check Act) यातून संस्थेची ध्येय त्यानुसार काम करणे, प्रक्रियेनुसार उत्पादन वा सेवेची तपासणी, मॅनेजमेंट रीव्हयू आणि त्यातून सातत्याने सुधारणा हे सर्व कस्टमर समाधानासाठी निश्चित करण्यात आले. ग्राहकाच्या गरजांनुसार व्यवसाय हे निश्चित झाले.2008 हे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट स्टॅंडर्ड होते. परत लोकांच्या सुचनेनुसार बदल आणि आढावे घेतल्याने 2015 मध्ये पुन्हा सुधारणा करण्यासाठी टेक्निकल कमिटीची स्थापना झाली. या कमिटीचे चेअरमन यावेळी म्हणाले - पुढच्या तीस वर्षात बदल होऊ नये यासाठी सर्वसमावेशक बदल आम्ही 2015 मध्ये केले आहे. हायर लेव्हल स्ट्रक्चर याचा विचार करून 1 ते 10 मुद्दांचा आराखडा तयार करण्यात आला.त्यातच सगळी स्डॅडर्ड बसवण्यात आली. क्वालिटी असो किंवा 2015 नंतर प्रसिद्ध झालेल्या पर्यावरण असो त्याचा क्रम सारखाच असला पाहिजे. हा आराखडा ISO SL ANNEXने निश्चित करण्यात आले. क्लाॅज १ स्टॅंडर्डचा स्कोप, २ संदर्भ ३ व्याख्या तसेच क्लाॅज नंबर ४ मधे संस्थेचा संदर्भ, संबंधितांच्या गरजा आणि अपेक्षा , त्या पुर्तते तले धोके आणि संधी, व्याप्ती, प्रक्रिया याचा विचार केला.

नंबर लिडरशिप वा उच्च व्यवस्थापनाची बांधिलकी हा आहे.

मधे नियोजन ज्यात संधी धोके, ध्येय याभर आहे.

७मधे साधनांचा विचार करून कर्मचारी विकास, प्रशिक्षण, ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌जाणीव उपकरणे या सगळ्याचा विचार केला आहे.

आठवा मुद्दा ऑपरेशन कंट्रोल अर्थात कृतींचे नियंत्रण आहे. यामध्ये तुमच्या प्रक्रियेतून पूर्ण झाल्यावर उत्पादन योग्य आहे की नाही याची तपासणी आणि योग्य असल्यास पुढे जाण्याची परवानगीही निश्चित आहे.

नववा मुद्दा आहे तपासणी आणि मूल्यमापन यात प्रक्रियांची तपासणी तर आहेच उत्पादनांची तपासणी आणि ग्राहकाच्या समाधानाची तपासणी हे लक्षात घेऊन योग्य मूल्यमापन आणि रिव्ह्यू साठी इंटरनल ऑडिट आणि मॅनेजमेंट रिव्ह्यू याचाही विचार या मुद्द्यात केला जातो.

दहावा आणि शेवटचा मुद्दा आहे तो सातत्याने सुधारणा.

या दहा मुद्द्यांच्या मांडणीमध्ये 2015 नंतरचे सगळे स्टॅंडर्ड बसवले असल्याने पि.डी.सी.ए. अप्रोच, प्रोसेसर अप्रोच आणि रिस्क-अपाॅरच्यूनिटी याचे सर्वसमावेशक विचार सर्व स्टॅंडर्ड मध्ये केले जातात. व्यवसायाचं अस्तीत्व हे त्यात येऊ घातलेले धोके आणि संधी ओळखण्यात. आणि त्यानुसार व्यूहरचना स्टे्टिजी निवड करण्यात मधून होते हे स्पष्ट आहे. त्या बरोबरच आणि संबंधितांच्या गरजा आणि अपेक्षांचा विचार केल्यास, यश निश्चितच आहे. या संबंधितांमध्ये आपले कर्मचारी ग्राहक सुद्धा येतात त्याविषयी विचार करून एक नवीन दिशा मिळाली आहे आणि याच्या मदतीने प्रगतीला आकाश मोकळे केले आहे.

प्लॅन डू चेक - मॉनिटरिंग इव्हॅल्यूशन (Monitoring Evaluation) असले पाहिजे. प्रक्रियेमध्ये सातत्याने सुधारणा असले पाहिजे हे निश्चित झाले. आता हे सगळे नंबर क्रम पर्यावरण आणि सुरक्षितता मानकातही तेच असल्यामुळे इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टीम (Integrated Management System) करणे आता सहज शक्य झाले आहे.

2015 चे बदल आता ५ वर्ष स्थापित झाले आहेत आणि क्यू एम एस बरोबर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी बरोबर सेफ्टी सर्टिफिकेशन काही संस्था करतात. सर्टिफिकेशनचे फायदे कळल्यामुळे फक्त एकच सर्टिफिकेशन मर्यादित न राहता, इंटिग्रेटेड सर्टिफिकेशन होऊन परिणाम आणि सुधारणा प्रत्येक संस्थेतून दिसायला लागतात. कृती नियोजन, योग्य परिणाम साधण्यासाठी प्रक्रिया आणि योग्य साधनांचा वापर करून सातत्याने सुधारणा या माध्यमातून चालू होतं, त्यावेळी संस्थेमध्ये उत्कृष्टपणे उत्पादन आणि सेवा मिळते.

त्यामुळे फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किंवा टेंडर साठी वा स्टेटस म्हणून प्रयत्न करू नका तर एक्सलंस मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद

ऊर्जा

एनर्जी ऑडिट आणि एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम सर्टीफिकेशन महत्त्वपूर्ण आहे. अर्थात एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम आवश्यक आहे. हे एनर्जी ऑडिट पूर्णपणे शास्त्रीय बैठकीवर आधारित आहे. २०१५ नंतर मॅनेजमेंट सिस्टीम रचना करताना हायर लेवेल स्ट्रक्चरच्या वेगवेगळ्या मुद्यांचा विचार केला जातो. पण एनर्जी ऑडिट करताना एनर्जी बॅलन्स स्पेसिफिकेशननुसार मोजमाप आणि कॅलक्यूलेशन, माहिती पडताळून आणि कुठे गैरवापर होत असेल तर तो थांबवणे. त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे ,याचा विचार केला जातो.

बेसिक सायन्स, फिजिक्स एनर्जी डायनामिक्स, थर्मो डायनामिक्स अशा इंजीनियरिंग विषयांबरोबरच टीम डायनामिक्स - बरोबरीने लोकांना जमवून घेण्याची कुवत आसणे अत्यावश्यक ठरते.

बऱ्याच वेळा असं होतं एखादा चिलर एसी रूममध्ये ठेवला असला, तरी त्याचा कुणाला त्रास होत नाही. पण ऑडिटरच्या लगेच लक्षात येतं. जर हा ऑडिटर सर्टिफिकेशनसाठी असेल तर ठीक, अन्यथा तो बाहेर काढल्यामुळे किती प्रमाणात विजेची बचत होईल तो सिद्ध करू शकला तरी, आवश्यक नसतानाही त्याच्याशी वाद घालायला काही तयार होतात. सर्वांचे मत, विचार, मनच संभाळून योग्य मार्ग काढून सुधारणा करणे खूप अवघड असतं. तिथे आवश्यक असते मॅनेजमेंटची बांधिलकी पण बऱ्याच वेळा त्यांचेही इगो टाळता येत नाही. 'तुम्ही काढलेल्या चुकांमुळे आमच्या लोकांचा उत्साह कमी होतो. इतर कामावर आहे त्याचा परिणाम होत आहे . तेव्हा तुम्ही आता आमच्या चुका काढू नका. त्याला तुम्ही फक्त सर्टिफीकेट द्या.' 'आमच्या कॉपिटीटरने पंधरा दिवसात आमच्यापेक्षा खराब असतानाही सर्टिफिकेट मिळवले आहे.' 'आम्हाला का नाही ? तुम्ही फार खोलात जाऊ नका. आम्हाला तेवढे सर्टिफिकेट द्या.' असं सांगणारे लोकही पाहिले आहेत. यांना सर्टिफिकेट हवे असते सुधारणा नको असतात. पण चुका समजून घेऊन दुरुस्त्या करायच्या नसतात. आणि दुर्दैवाने सर्टिफिकेट देणारेही अनेक लोक आज आहेत . त्यामुळे प्रामाणिकपणे सुधारणा सांगण्याचं कौशल्य , माणसांना समजून घेणाऱ्या कौशल्यापेक्षा कमी प्रतीचे ठरतात. आणि इथे ऑडिटचा आणि सल्लागाराचा खरा कस लागतो.

एनर्जी वेस्टेज (Energy Wastage) नुकसान बघताना सहज होणारे बदलही लक्षात घेऊन सुधारणा करण्यात मध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ व्हेंटिलेशन किंवा वायूविजन हवा खेळती ठेवण्यासाठी योग्य जागी खिडक्या, यासाठी समोरासमोर खिडक्या कारखाना तयार होताना केलेल्या असतात. पण कोणीतरी तिथे कपाटात ठेवून कधीच हवा खेळती होणार नाही याची काळजी घेतली असती. आता तुम्ही त्यांना काढण्याची गोष्ट करताच त्याच जागी कपाट ठेवणे किती आवश्यक आहे हे तुम्हाला ते पटवून देतात. आणि ते असल्याने हवेचा काहीही त्रास होत नाही पण हालवलं तर हालचालीला किती त्रास आहे आणि अजून किती त्रास आहे याच्यावर वाद घालण्याची त्यांची तयारी असते. शेवट त्यांना त्यांचे बिल भरू द्या असा विचार तूम्ही करता आणि सोडून देता.

तर कधी दुसरे टोक. महागडी उपकरण भरमसाठ माहिती म्हणजे मॅनेजमेंट असा गैरसमज दिसतो. पुढे बऱ्याच लोकांना वाटतं फक्त कागदोपत्री माहिती आणि भरपूर डाटा दाखवून सुधारणा पुरेशा आहेत. १५ च्या जागी १२ हा बदल एखाद्या वेळी स्विकारला जाईल. पण १/२ कसा समजून घेऊन चालणार. वापर कसा करायचा काय सुधारणा करायच्या कुठल्या गोष्टी उपयोगी नाहीत . सुधारणा का, कशी बदल का, त्याचा वापर कसा होतो? त्यांना समजून सांगा. ज्या वेळी गोष्टी न बदलता तिथेच खऱ्या अर्थाने कागदपत्रे तयार करण्यासाठी ऑडिट , सुधारणा ,सर्टीफिकिट आणि बनवा बनली केली जाते, आणि त्याच मुळे मध्ये संस्थेचे वाया जाणाऱ्या पैशांपेक्षा ईगोकडे अधिकाराचे, गैरवापर, आकडे बदलणे, दिसते तिथे दुर्लक्ष करून ऑडिट वा कन्सलटंसी संपवणे एवढच त्यांच्या हातात असते. खरं सांगायचं तर टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट आणि कर्मचारी सहभाग नसेल तर कुठल्याच ऑडिट वा मॅनेजमेंट सिस्टीम यशस्वी ठरत नाही . लोकांनी आपापल्या मतभेद विसरून इगो सोडून, वेगवेगळे विचार बाजूला ठेवून एका दिशेनी वाटचाल करणे, हे प्रत्येक मॅनेजमेंट सिस्टीमच्या यशा साठी अत्यंत आवश्यक आहे . आणि हे खरं त्याच्या एच आर किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे खरे यश. बरेचदा संस्थांमध्ये हे डिपार्टमेंट असतात ते काम वेगळेच करत असतात . ऍडमिनिस्ट्रेशन, लीव्ह, पेमेंट मॅनेजमेंट आणि बर्थडे पार्टी त्यांची कामांची यादी असते. लायकी असलेली, कमिटेड आणि ध्येयवेडी माणसं मिळवणं शक्य नसतं. त्यामुळे मिळेल त्यात किंवा हातात आहे ते साजरा करण्याची वृत्ती किंवा आहे ते साजरा करण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नसते. हा दाखवण्याचा किंवा साजरा करण्याचा प्रयत्न ऑडिटरलाही माहिती असतं. सल्लागाराला कन्सल्टंलाही माहिती असते. ऑडिट करत असतात त्यामुळे ठराविक मर्यादेनंतर या गोष्टींकडे ऑडिटर दुर्लक्ष करायला लागतात. संस्थेच्या बांधीलकीनुसार ऑडिटरची बांधीलकी ठरत असते. हे स्पष्ट आहे. आपण हे देखील समजून घेणे आवश्यक आहे.

'माझ्या नोकरीचा प्रश्न आहे मला एन सी (NC) देऊ नका' असं मागणे ऑडिटरचे जाऊन हात बांधून टाकतात. पण या सगळ्यांनी आपण संस्थेच्या प्रगतीला अडथळा करतोय आणि जर काही चुका सापडल्या तर त्यातून सुधारणा होणार आहे हे समजले पाहिजे. हा विचार करण्याची कुवत जर संस्थेत नसेल तर फक्त कागदोपत्री ऑडिट होतं. आणि कागदपत्रांची सुधारणा आवश्यक ठरते. संस्थेला सुधारण्यासाठी माणसाचे घडवण्यासाठी नाही. खरंतर क्वालिटी किंवा व्यवस्थापन पद्धती हे का डिपार्टमेंट पुरती मर्यादित नसते. तिच्या पातळीनुसार संस्थेची पातळी ठरत असते. ऑडिटने नाही किंवा मॅनेजमेंटने योग्य वापर करणे आणि कामात सुधारणा करणे आवश्यक ठरतात. ऑडिटरला योग्य ते सेक्टरसंबधित ज्ञान असले पाहिजे, त्याला योग्य इंजीनियरिंग ज्ञान असले पाहिजे, मॅनेजमेंट हा त्याचा हातखंडा असला पाहिजे, लोकांच्या कलाने घेऊन , डाटा कसा वापरायचा, त्याचे विश्लेषण कसं करायचं हे स्टॅटिस्टिक्स आले पाहिजे, परत क्वालिटीची नजर असली पाहिजे, पर्यावरणाची जाणीव असली पाहिजे, थोडक्यात ऑडिटर ही सर्वगुणसंपन्न व्यक्ती असली पाहिजे. कदाचित नाही. येथे एकापेक्षा जास्त एक्सपोर्ट बरोबर घेऊन गेला तरी चालेल पण परवडते असे नाही. मग होता होता तडजोड सुरू होते.आणि त्यामुळे तुमचे संस्थेचे ईंटरनल ऑडिटर कौशल्य वाढवणं स्टॅंडर्ड समजून घेणे, उद्देश काय आहे हे समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे स्वस्तात सर्टिफिकेशन मिळत आहे म्हणून त्या वाटेला जाताना, ते पैसे वाया तर जात नाहीयेत ना ? हे तपासून बघणे आवश्यक ठरते आणि माझ्या मते पूर्णपणे इंजिनिअरिंग क्षेत्रात आणि व्यवस्थापन कौशल्यावर आधारित ज्ञान आणि अनुभवाचा वापर करुन करायची गोष्ट मॅनेजमेंट सिस्टीम सुधारणा आहेत. अत्यंत बुद्धिमान माणूस पण अनुभव नसेल तर चुका करू शकतो. त्यामुळे सर्वसाधारण ऑडीटर पेक्षा संस्थातील अनुभवी हे वेगळे ठरतात. तसे पाहायला जाता जरी मात्र लेवल स्ट्रक्चर एकच असेल, तरी प्रत्येक प्रत्येक स्टॅंडर्ड ची कोर डिसिप्लिन किंवा गाभा वा उद्देश हा वेगळा असतो. फूड सेफ्टी बद्दल ज्ञान असेल तर आयएस एम एस (ISMS) करू नका. ज्ञान किंवा बेसिक इंजीनियरिंग आता आठवत नसेल तर त्या वाटेला जाऊ नका. पण हल्ली सर्टिफिकेशन हा बिझिनेस झाला आहे.थोडेफार या पार्श्वभूमीवर सर्टिफिकेशन योग्य असलेली माणसं जर संस्थेला निवडता आली आणि तर योग्यता ठेवून त्याचा परतावा किंवा मोबदला नक्कीच व्हयॅल्यू अँड ऑडिट होऊ शकतो. अन्यथा कागदोपत्री खूप सुधारणा होतात आणि हातात काहीच उरत नाही थोडेफार बदल सगळीकडेच असतात 15 टक्के सुधारणांच्या जागी 12 टक्के सुधारणा झाल्या तरी मला वाटतं चालेल पण पंधरा टक्के कागदपत्रावर आणि खरं म्हणजे एखादा टक्का हे मान्य नाही .हा जाब विचारण्याची कुवत संस्था मध्ये येईल, तेव्हा ते सर्टिफिकेशनच्या पुढे बघायला लागतील. आणि त्या वेळी खरे प्रमाणिक ऑडिटर आणि प्रामाणिक सर्टिफिकेशन सुरू होईल अशी आशा वाटते.हे कुठल्या संस्थेकडून येतात किंवा त्याला कंट्रोल लावला आहे का हे जाणून फक्त संस्थाचालकांनी घेऊन, त्रास असेल तर सुधारणा करण्यासाठी आणि ऑडिटिंग जर जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर मला वाटतं बाहेरच्या ऑडिटर पेक्षा अंतर्गत ऑडिटर्स फार महत्त्वाची भूमिका बजावतील. आणि तुमचं काम खणखणीत असेल तर कुठलाही कस्टमर टेंडरसाठी होणार सर्टिफिकेशन हवा असा आग्रह धरणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा तुमची काय गरज आहे हे समजून घ्या आणि त्या नुसार व्यूहरचना आखली आहे आणि व्यवस्थापनांनी कर्मचारी सहभागातून प्रगती साधली आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी ऑडिटरवर सोपवा..

कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी योजलेल्या उपाययोजनांचे नियोजनही आवश्यक आहे पण फक्त कागदोपत्री माहिती वा पुरावा म्हणजे सर्टिफिकेट नाही हे निश्चित समजून घ्या.

सुधारणा प्रकल्पातून यश आणि यशाचे सर्टिफिकेट हा दाखला. दाखला मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे म्हणजे कदाचित सर्टिफिकेट असेल पण यश नाही.