WASH

  • Workplace Assessment for Safety and Hygiene (WASH) Scheme assessment - Start-up readiness post-COVID-19

  • Also check SAATHI - for Hospitality Industry - (System for Assessment, Awareness & Training for Hospitality Industry)

वॉशची माहिती

वाॅश हे वर्क प्लेस असेसमेंट फॉर सेफ्टी ऍड हायजिन (Workplace Assessment for Safety and Hygiene) या इंग्रजी आद्याक्षरांनी बनलेल्या मानकाचे नाव आहे. अर्थचक्र फिरते ठेउन करोना प्रसाराला आळा घालण्यासाठी भारतीय जनतेला खबरदारी कशी घ्यावी हे सांगणारी नियमावली.

कोविड-19 नंतर काम सुरू करताना घेण्यात येणारी काळजी योग्य आहे - हे तपासून घेऊन त्रुटींवर सुधारणा सुचवल्या असलेला रिपोर्ट आणि सर्टिफिकेट नाममात्र दरात तुमच्या कारखान्यातल्या तपासणीवरून किंवा ऑनलाईन तपासणीवरून तुम्हाला मिळतो.

यात १५ घटकांच्या मदतीने तुमची तपासणी होते.

यातल्या तपासणी सुची - चेक लिस्टच्या मदतीने तुम्हीही तपासणी करुन शकता.

अडचणीच्या वेळी आम्हीही मदत करू. पहिला घटक आहे लिडरशिप. उच्च व्यवस्थापनाची बांधिलकी नसेल, तर कुठली सर्टिफिकेट शक्य नसते.

दुसरा मुद्दा आहे कायदेशीर बाबींची पूर्तता.

तिसऱ्या घटकात बिझनेस कंटिन्युटीचा विचार केला आहे. यात कोविडच्या संदर्भात विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे.

चवथा मुद्दा धोके/रिस्क व्यवस्थापन आहे. आरोग्य आणि शुचिता (Safety and Hygiene) याचा विचार करून कारखान्यांसाठी जे धोके आहेत त्याचाच विचार यात अपेक्षित आहे.

पाचवा घटक आहे - कम्युनिकेशन - संवाद - यात कारखान्यातील व कारखान्या बाहेरील (इंटर्नल व एक्सटेर्नल - internal & External) संवाद साधताना घ्यायची काळजी आणि सुचनेनुसार तरतुदी करण्यात आल्या पाहिजेत. विशेषतः कायद्याने बंधनकार कळविणे तसेच आवश्यक अश्या माहितीबाबत नियमांनुसार अंबालबजावणी करावे.

सहावा घटक आहे हायजिन अँड सेफ्टी - शुचिता आणि सुरक्षा - यात व्यक्तिगत पातळीवर आणि कार्य स्थळाच्या पातळीवर नियंत्रण नियमावली तयार केली आहेत. त्यात सोशल डिस्टंसिंग चारही समावेश आहे.

सातवा मुद्दा - खबरदारी - यात सॅनिटाझरचा वापर, पि पि ई (PPE) असे उपघटक आहेत.

आठवा मुद्दा आहे ट्रेनिंग अँड अवेअरनेस - यात सर्व संबंधितांना प्रशिक्षण आणि जाणिव देण्यात आली पाहिजे.

नववा मुद्दा आहे - वेस्ट मॅनेजमेंट - कचऱ्याची विल्हेवाट. यात संसर्गजन्य कचऱ्याचा विचार करण्याची गरज आहे.

दहावा मुद्दा आहे - व्हेंटिलेशन - वायूविजन - शुद्ध खेळती हवा असावी म्हणून ए सी च्या फिल्टर तपासणी करण्यात यावी.

अकरावा मुद्दा आहे - पब्लिक ईंटरऍक्शन- सामाजिक संवाद - जर करूनच पेशंट आढळळा तर त्याच्या नातेवाईकांना कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना आणि सिविल अथोरिटी तसेच समाजात काहीतरी घटकांना काय आणि कशी माहिती द्यावी या सगळ्याचा विचार केला आहे

पुढचा मुद्दा आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट - पुरवठा साखळीच्या माध्यमातून आपण आपल्या इतर संबंधित पुरवठादारांवर योग्य नियंत्रण ठेवू शकतो. आपल्या करणार्‍याकडे येणारी माणसं बाधित व्यक्तीच्या संपर्कात आली असतील, तर त्यांच्यामुळे आपल्यालाही संपर्कातून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले पुरवठादार योग्य काळजी घेत आहेत हे तपासून बघणे आवश्यक आहे. आणि या व्यवस्थापनाला सप्लाय चेन मॅनेजमेंट असे म्हंटले आहे आहे त्यानंतर तेरावा मुद्दा ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट - वाहतूक व्यवस्थापन आहे - ज्याला ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट वाहतूक व्यवस्थापन म्हणतात. त्यात सामानाची वाहतूक तसेच लोकांची वाहतूक या दोघांचा व्यवस्थापनाचा विचार आवश्यक ठरतो. दोन्ही वेळेस कमीतकमी संपर्क व्हावा किंवा संपर्क होऊच नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे.

चौदावा मुद्दा आहे - कागदपत्रांची पूर्तता - डॉक्युमेंशन रिक्वायरमेंट - कागदपत्रांमध्ये मार्गदर्शक कागदपत्रे ज्याला आपण डॉक्युमेंट असे म्हणतो. आणि पूर्ततेचा पुरावे ज्याला आपण नोंदी किंवा रेकॉर्ड असे म्हणतो. या दोन्हीचा समावेश होतो. त्या दोन्ही गरजा या घटकात सांगितले आहेत. आणि त्याची पूर्तता आपण करणे आवश्यक आहे.

पंधरावा आणि शेवटचा घटक आहे भेदभाव पक्षपाती पद्धतीचा प्रतिबंध - कंट्रोल ऑफ डिस्क्रीमिनेटरी प्रॅक्टिसेस- एखादी व्यक्ती कमकुवत आहे किंवा करोना बाधितांच्या संपर्कात आहे बाधित व्यक्तीच्या जवळच्यांच्या संपर्कात आहे म्हणून त्याला पी पी इ (PPE) द्यायचे नाही, किंवा त्याला काम द्यायचं नाही, किंवा त्याचा पगार काटायचं यासारखी पक्षपाती वागणुलीस प्रतिबंध प्रत्येक संस्थेने करणे आवश्यक आहे. असा महत्त्वपूर्ण मुद्दा या घटकात सांगितलेला आहे.

तसं पाहायला गेलं तर काही घटक पूर्णपणे व्यवहारज्ञान - कॉमन सेन्स वर आधारित आहेत. त्यामुळे ते पण अगदी सहज शक्य आहे. ते पाळून आपल्या संस्थेत किंवा आपल्या संबंधितांना संसर्गापासून वाचवण आपलं आद्यकर्तव्य ठरते. त्यामुळे स्वतःच्या स्वतःच्या 15 घटकांची तपासणी करून घेणं हे सगळ्यात चांगले. आणि ही आपली खात्री झाल्यावर थर्ड पार्टी म्हणजे ज्यांच्याशी आपला काही संबंध नाही, ज्यांना आपल्या व्यवसायात रस नाही , अशा व्यक्तीकडून तपासणी करून घेऊन एक सर्टिफिकेट मिळवणे केव्हा ही चांगले. अजून चांगला मुद्दा आहे ती याची किंमत. म्हणजे एका जागेला केवळ १०,५०० ठेवली आहे. त्यामुळे शक्य तितक्या जास्त संस्थांनी यात सहभागी व्हा आणि आपल्या कार्यस्थळाची सुरक्षितता आणि आपल्या संबंधितांच्या आरोग्य याची काळजी घ्यावी हे आवाहन. धन्यवाद.

WASH Presentation (PDF)

WASH Presentation as slideshow

Success Story of Katraj Dairy

Katraj Dairy has once again proved that it is possible to comply with all the rules of Quality, Environment and Safety, all while supplying customers without interruption of essential services, when the whole country is struggling to keep the business going by implementing preventive measures in various ways during the Corona era. Of course, Katraj Dairy has achieved an important certification by continuing to produce milk and dairy products. This certificate will be a proof of co-operation and Marathi perseverance. At every level, Katraj Dudh Dairy has shown that it is always an organization that takes care of the interests of the society and takes the next step. On the auspicious occasion of Ganesh Chaturthi, Katraj Dairy has received this certificate from Mr. Sacchidanand Gogawale, WASH Assessor, QCI, as an acknowledgment of their hard work in supplying milk and milk products to all the people of Maharashtra during this period without any closure. On this occasion, while praising the work of the organization, Assessor appreciated the leadership of the organization, Chairman Sir, MD Sir, Vaishali Mam and the entire Corona team. The success achieved in a short span of time under the guidance of Dr. Sanjeevani which is certainly remarkable. With this goal in mind, on the auspicious occasion of Ganpati Chaturthi, Katraj Dairy has been awarded the WASH certificate (i.e. Workplace Assessment for Health & Safety) with Employee and Supplier Participation. India's first dairy was certified on August 8, while Katraj has achieved success in just a fortnight. Had it not been for the moment of Ganesh Chaturthi, Katraj would have been honored to be the first dairy in India. However, it is not easy to get the number three position in India and the number one position in Maharashtra. Now Katraj's products are not only quality and safe, but Katraj is perfect in the fight against Corona. With this great success in the field of co-operation, they have reaffirmed that we care about the safety of all our stakeholders - suppliers, collection centers, distribution centers, employees, and their customers. The Pune District Milk Producers' Association i.e. Katraj has won the honor of being the first dairy in Maharashtra & third dairy in India by passing the QCI test of safety and purity in the fight against Corona.

कात्रज डेअरीची यशोगाथा

करोनाच्या काळात सारा देश विविध मार्गाने प्रतिबंधक उपाय राबवून, व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लढत असताना, अत्यावश्यक सेवेत खंड न पडू देता ग्राहकांना पुरवठा करणे गुणवत्ता पर्यावरण आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे शक्य आहे, हे कात्रज डेअरीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अर्थात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन चालू ठेवून एक महत्वपूर्ण सर्टिफिकेशन कात्रज डेअरीने मिळवला आहे. हे प्रमाणपत्र सहकार आणि मराठी जिद्द यांचा एक पुरावाच ठरेल. तर प्रत्येक पातळीत स्वतःबरोबर समाजाचे हित जपणारी आणि पुढचं पाऊल टाकणारे संस्था ही नेहमीपुढेच असते हे कात्रज दूध डेअरीने दाखवून दिले आहे. एकही दिवस बंद न ठेवता याही काळात महाराष्ट्रातील साऱ्या जनतेला आवश्यक असलेला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करत असताना केलेल्या परिश्रमाची पावती म्हणून गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर QCIच्या असेसर (Assessor) माननीय सच्चिदानंद गोगावले यांच्याकडून त्यांना हे सर्टिफिकेट मिळाला आहे. सदर प्रसंगी संस्थेच्या कामाचे कौतुक करताना असेसर यांनी संस्थेचे नेतृत्व चेअरमन साहेब, एमडी साहेब, वैशाली मॅडम आणि साऱ्या करोना टीमचे खूप कौतुक केलं. डॉक्टर संजीवनी यांच्या मार्गदर्शनाने अल्पावधीत मिळवलेलं हे यश निश्चितच लक्षणीय आहे. हे ध्येय समोर ठेवत गणपती चतुर्थीचा शुभ मुहूर्त साधत कर्मचारी सुरक्षितता आणि पुरवठादारांचे सहभागने कात्रज डेअरीने वॉश अर्थात वर्कप्लेस असेसमेंट फॉर हेल्थ सर्टिफिकेट मिळवले आहे. भारतातली पहिली डेअरी ही आठ ऑगस्ट रोजी सर्टिफाय झाली आहे, तर अवघ्या पंधरा दिवसात कात्रजने यश मिळवले आहे. गणेश चतुर्थीचा मुहूर्त जर ठरला नसता तर कदाचित भारतातली पहिली डेअरी होण्याचा मान कात्रजने नक्कीच मिळाला असता. तरीही मुहूर्त साधत भारतात तिसऱ्या क्रमांकाचा आणि महाराष्ट्रात पहिला नंबर मिळवणे काही सोपं नाही. आता कात्रजची उत्पादन फक्त गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षितच नाहीत, तर करोना विरुद्धच्या लढ्यात कात्रज परिपूर्ण आहे. सहकार क्षेत्रातील हे मोठे यश मिळताना आपल्याबरोबर आपल्या सर्व संबंधितांचे म्हणजे पुरवठादार, कलेक्शन सेंटर, डिस्ट्रीब्यूशन सेंटर, कर्मचारी, आणि त्यांचा ग्राहक या सर्वांचा सुरक्षिततेचा विचार आम्ही करतो हे पुन्हा त्यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील वॉश अर्थात करोना विरुद्ध लढ्यातील सुरक्षितता आणि शुचिता याची परीक्षा QCI तर्फे देऊन , महाराष्ट्रातील पहिली डेरी होण्याचा मान पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज यांनी मिळवला आहे यांच्या पूर्वी आख्या भारतात दोन हे नामांकन मिळाले आहे या पार्श्वभूमीवर भारतात तिसरी आणि महाराष्ट्रात पहिली येण्याची कामगिरी निश्चितच लक्षणीय आहे.

More Info

When I shared with my contacts about the ZED Training being conducted, the first reaction was - Why? ZED is not active currently - True, it is not active due to COVID-19.

That's why we need to understand how to overcome the COVID-19 calamity. The answer is WASH. All business owners and organisations need to know this WASH - Workplace Assessment for Safety and Hygiene.

WASH has 15 elements, defining the preventive measures for mitigating the spread of COVID-19. The checklist is also available free for self assessment. It defines the protocols for use and prevention and disposal of PPE (Personal Protective Equipment). This helps us to minimize the spread during the contacts due to work or work related stakeholders' lack of prevention.

Like ZED one has an option to do self assessment based on the information available free. Thereafter if one feels essential for sake of recognition or otherwise one can proceed for third party assessment from CB (Certifying Body).

However, it is extremely essential that you may insist all associates follow the necessary precautions. At least the suppliers have done the self certification process. As you are dependent on them for your business continuity, so take care of their business continuity. ISO 22301 is the best guide for business continuity management system, however now minimum required precautions, Instruction, PPEs is being supported by ZED team.

So this program on ZED does include introduction to WASH and BCMS.

Through this program you will be guided for employees, business safety, and also excellence and world class Quality. If business is sustained only then the excellence pursuit or Certification will matter else it is meaningless. So, the organisations already certified for ZED as well those who wish to get certified or otherwise need to understand WASH. The preventive measures for safety. Unleash you understand and adapt to these preventive measures with it without ZED your Business continuity and management that of will be at stake . In case you ignore this, your ability to sustain in-spite of COVID, will be tested. WASH, BCMS are the standards that will help you to develop required resilience.

ZED includes multiple standards and also Lean protocol, including IP- intellectual property rights, . In nutshell ZED is all inclusive protocol. How to prepare for it, whether to prepare for it or not is an individual choice. But if you are not aware about this protocol , and the risk due to lack of knowledge and controls and mitigation , surely it will lead to a business risk.

ISO 9001 for Quality, ISO 14001 for environment, ISO 45001 for OHS - safety, ISO 51001 for energy management, ISO 27001 for information security and ISO 22301 for Business continuity certification with Lean and IP, trade mark may fetch lot of money, comparatively you may find ZED easy and simple.Those who have achieved ZED , have they used it effectively, and other why should they do it may be clear post these sessions.

Also introduction to WASH - workplace assessment for safety and hygiene, will be done. In short as applied to current disruption due to COVID and for current situation what data is priority, how to use it, what are business dependencies, either process, people, supplier, contractor, equipment, customer, information must have been identified but a systematic way to address it will help us. So, although ZED Regeneration or Certification is not feasible now, let us learn the important information for business excellence for continual improvement fast and accelerated recovery through these sessions.

अधिक माहिती

मराठा चेंबर तर्फे जेव्हा झेड (ZED) चे ट्रेनिंग आहे हे माझ्या ओळखीच्या लोकांना मी कळवलं, तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया आली - कशाला? सध्या तर झेड रजिस्ट्रेशन, झेड तपासणी बंद आहे ना ? होय, झेडची कारवाई सध्या बंद आहे . म्हणजे सध्या रजिस्ट्रेशन थांबले आहे. सर्टिफिकेशन थांबले आहे. आणि त्याचे मुख्य कारण करोना हे असलं, तरीही त्या वर मात करण्यासाठी आवश्यक ती तपासणी प्रक्रिया वॉश (WASH) आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी काय करतात? याची माहिती सहाजिकच सर्वांना विशेषतः कंपनीच्या मालकांना कंपन्यांना सुद्धा आवश्यक आहे.

काय करावं याची माहिती, कार्यस्थळातील सुरक्षितता आणि शुचिता किंवा वॉश (WASH) या इंग्रजी अक्षरांनी बनलेल्या शब्दात म्हणजे वर्क प्लेस असेसमेंट फॉर सेफ्टी आणि हायजिन (Workplace Assessment for Safety and Hygiene) या स्टॅंडर्ड च्या 15 घटकांच्या मदतीने सांगितली आहे.

संपर्कामुळे होणारा करोनाचा प्रसार मर्यादित राहण्यासाठी, करायच्या प्रतिबंधात्मक योजनांची माहिती या स्टॅंडर्डमध्ये / प्रणालीत दिली आहे. तपासणीसाठी आवश्यक ती तपासणी सूची आणि वापरल्या जाणाऱ्या ऑडिट रिपोर्टची सर्व माहिती, वापरल्या जाणाऱ्या व्यक्तिगत सुरक्षा साधने म्हणजे पर्सनल प्रोटेकक्टीव ईकविपमेंट -पी पी ई (PPE - Personal Protective Equipment) - यांच्या वापराची , तसेच विल्हेवाटीची म्हणजेच डिस्पोजलची (disposal) माहिती या स्टॅंडर्डमध्ये / प्रणालीत मध्ये दिली आहे. आपल्या कामामुळे किंवा कामाच्या संदर्भात येणारे व्यक्तीमुळे किंवा त्यांच्या गैरवर्तनाची मुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून करायच्या प्रतिबंधक योजनांची यादी या स्टँडर्ड मध्ये दिली आहे.

झेड प्रमाणे, आधी तुम्ही स्वतः त्याची तपासणी करून घेणे अपेक्षित आहे. आणि सगळी माहिती अगदी चेकलीस्ट सुध्दा नि:शुल्क किंवा फ्री या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ती समजून घेऊन त्याप्रमाणे आपण काम करतो आहे, याची स्वतः पडताळणी करून झाल्यावर, आवश्यकता वाटल्यास इतरांना कळावं म्हणून सर्टिफिकेशन एजन्सीकडून किंवा थर्ड पार्टी कडून तपासणी करून घेणे, आवश्यक वाटल्यास कराता येते. पण तुमच्या किंवा तुमच्या व्यवसायासंबंधी जे लोक आहेत, त्यांनी तुमच्या अत्यावश्यक सूचनांचे पालन करावे यासाठी आग्रह मात्र नक्की करा. सेल्फ सर्टिफिकेशन तरी करावे हा आग्रह धरा. कारण तुम्ही त्यांच्यावर अवलंबून असता. आणि हे परावलंबित्व तुम्हाला संसर्ग किंवा रोग देऊ शकते. तुम्हाला पण स्वतःची तसेच स्वतःच्या व्यवसायाशी काळजी तो बंद तर होत नाही ना ही काळजी घेतली पाहिजे. व्यवसायात सातत्य अर्थात व्यवसाय बंद होत नाहीये ना याची काळजी तुम्ही बिजनेस कंटिन्युटी मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात ISO 22301 या माध्यमाच्या सहाय्याने तुम्ही घेऊ शकता. पण किमान तुम्ही स्वतःची आणि त्याचप्रमाणे पुरवठादार आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी काय काळजी घ्यावी . कोणत्या कमीतकमी सूचनांचे पालन करावे, कुठले पी पी इ (PPE) वापरावयाचे, यासाठी या माध्यमातून सगळी झेड टीम मदतीला पुढे आली आहे.

या कार्यक्रमात वॉश आणि बिजनेस कंटिन्युटी याचा समावेश करण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. व्यवसाय सातत्य आणि सर्वांची सुरक्षितता हा आता महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे, आणि त्यामुळे त्यांची तोंडओळख आपण या कार्यक्रमात करून घेत आहोत.

कार्यक्रमामधून आपले कर्मचारी आपला व्यवसाय आणि संबंधीत विषय सुरक्षित राहून, आपल्या व्यवसायात सातत्य , सुरक्षितता यावर आणि त्यातूनच उत्कृष्टता किंवा जागतिक दर्जा प्राप्त करावा हा उद्देश आहे.

शीर सलामत तो पगडी पचास- व्यवसाय चालू राहिला तर त्याला मिळालेली सर्टिफिकेट आणि उत्कृष्टतेचा वाटचाल चालू राहील. अन्यथा या सगळ्याला काहीच अर्थ उरणार नाही . आणि त्यामुळे ज्या कंपन्यांनी झेड केला आहे त्यांनी आणि ज्या करू इच्छितात, त्यांनी सर्वात अधिक हा विचार समजून घेणे आवश्यक आहे.

यासाठी आहेत ते सुरक्षिततेचे प्रतिबंधक उपाय तसेच पर्याय समजून घेण्यासाठी मदत होईल. त्यामुळे झेड करायचं नसेल तरीही तुमच्या व्यवसायाची सातत्य किंवा सुरक्षिततेच्याकडे कानाडोळा न करता किंवा संसर्गामुळे दुबळी न राहता या करोना संकटाला तोंड देण्याची तुमची व्यवसायिक कुवत किती आहे, हे तपासण्यासाठी तुम्हाला वॉश या मानकाची तसेच बीसीएमएस म्हणजेच बिझनेस कंटिन्युटी या मानकाची खूप मदत होईल.

झेड मध्ये अनेक स्टॅंडर्ड समाविष्ट आहेत. तसंच लीन ही कार्यपद्धती पण अपेक्षित आहे. इंटलेक्चुअल प्रॉपर्टीचाही त्यात उल्लेख येतो. थोडक्यात झेड हे सर्वंकष निर्देशन आहे .

झेड सर्टिफिकेशन ची तयारी करायची का? त्याची अंमलबजावणी करायचे का? त्या वाटेने जायचं का ? नाही? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण या माध्यमाबद्दल जर पुरेशी माहिती नसेल, तर व्यवसायाच्या येऊ घातलेले धोके किंवा संधी याची जाणीव नसल्यामुळे, त्यावरील उपाय योजनांची, त्या संबंधी माहिती नसेल, तर तुमच्या व्यवसायाला निश्चित धोका संभवतो, हे मी सांगू शकतो .

कॉलिटी/गुणवत्तेसाठी ISO 9001, पर्यावरणासाठी ISO 14001, सुरक्षिततेसाठी ISO 45001, ऊर्जा बचतीसाठी ISO 50001, इन्फॉर्मेशन सुरक्षिततेसाठी ISO 27001, व्यवसायाच्या सातत्यासाठी ISO 22301 या सर्व सर्टिफिकेटवर होणारा खर्च बघता, झेड हे साधं सोप्प आणि सहज वाटायला लागते.

ज्यांनी झेड मिळवलं आहे, त्यांनी त्याचा योग्य वापर केलाय की नाही? हे तपासून बघण्यासाठी किंवा ज्यांनी झेड केलंच नाही त्यांनी झेड का करावं यासाठी, या व्याख्यानमालेचे उपयोग होईल. थोडक्यात झेड आणि झेड नंतर काय? झेड कशासाठी? या दोन्ही मुद्यांचा व्याख्यांनां मध्ये विचार केला जाईल .आणि त्याचबरोबर बिजनेस कंटिन्युटी - व्यवसाय सातत्य यासाठी महत्त्वाचे मुद्दे आणि त्यासाठी वापरली जाणारी तंत्र थोडक्यात सांगितली जाईल. निदान त्याची तोंड ओळख या चार दिवसात आपण करून घेणार आहोत.

तसेच वॉश म्हणजे कार्य स्थळाची सुरक्षितता आणि शुचीता याचीही आपण ओळख करून घेणार आहोत. थोडक्यात आजच्या काळाला, आजच्या संकटाला अनुसरून, आपल्याकडे किती डाटा असावा ? तो डाटा कसा वापरावा? आपण कोणा कोणावर अवलंबून आहोत? आणि सातत्यासाठी कुठली प्रक्रिया, व्यक्ती, उपकरणं, ग्राहक पुरवठादार, माहिती यासारख्या अत्यावश्यक गोष्टी आहेत , याचा विचार प्रत्येकाने केला असेल. पण तो एका सुसूत्रतेने करून आपल्या व्यवसायात प्रत्येक गोष्टींचा स्थान काय आहे - हे समजून घेणारी ही संकल्पना आपल्याला खूप मदतीचे ठरणारे आहे.

त्यामुळे आता या क्षणी झेड किंवा कुठल्याही सर्टिफिकेशन किंवा रजिस्ट्रेशन करणे किंवा त्याचे सर्टिफिकेशन मिळवणे शक्य नसलं तरी ही महत्त्वाची माहिती शिकून, आपल्या व्यवसायात सातत्याने सुधारणा, आणि त्वरेने किंवा अत्यंत गतीने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी करायची तयारी, कशी करावी याचे मार्गदर्शन या व्याख्यानमालेत तुम्हाला मिळेल...

COVID-19 Resources

Webinar : PPE Kits & Mask Types : Building Awareness & Bridging The Standardization Gap

By

Department of Textile Design

National Institute of Fashion Technology,Mumbai